भारतीय तायक्वांदो संघ प्रशिक्षकपदी क्रीडा मार्गदर्शक प्रवीण बोरसेंची निवड 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

सोलापूर : मॅंचेस्टर (इंग्लंड) येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघ सहभागी होणार असून या संघाच्या प्रशिक्षकपदी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण मधुकर बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा 15 ते 19 मेदरम्यान होणार आहेत. 

ही निवड तायक्‍वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. श्री. बोरसे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात तायक्वांदो खेळाचे मार्गदर्शन करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक खेळाडू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते झालेले आहेत. तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रवीण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करणारा नीरज चौधरी याचाही या संघात समावेश आहे. याआधीही श्री. बोरसे यांनी कनिष्ठ आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धा, जागतिक कॅडेट स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे.

या स्पर्धेसाठी झालेल्या निवडीचे क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक अनिल चोरमले, पुणे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान, विद्या व्हॅली संस्थेचे अध्यक्ष विवेक गुप्ता व मुख्याध्यापिका नलिनी सेनगुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

​ ​

संबंधित बातम्या