संजय बांगर नको मग प्रविण अमरे चालणार का?

वृत्तसंस्था
Monday, 29 July 2019

भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गुणवत्ता शोध मोहिमेतील प्रवीण अमरे यांनी देखील भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. 

मुंबई : भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गुणवत्ता शोध मोहिमेतील प्रवीण अमरे यांनी देखील भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या 50 वर्षीय अमरे यांनी या पदासाठी अर्ज केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. अमरे कारकिर्दीत 11 कसोटी सामने खेळले असून, 425 धावा केल्या आहेत. अमरे यांनी 37 एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 

स्व. रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अमरे यांनी आतापर्यंत मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असून, त्यांनी मुंबईला विजेतेपदही मिळवून दिले आहे. सध्या ते अमेरिका क्रिकेटमध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून काम पहात आहेत. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीची जेवढी चर्चा होत नाही, तेवढी फलंदाजी प्रशिक्षकाची सुरू आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री णि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचे पारडे पुन्हा जाड मानले जात असले, तरी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना हटवले जाणार यात शंका नाही.


​ ​

संबंधित बातम्या