सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे आक्रमकता नव्हे: विराट कोहली

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 August 2018

फलंदाजी करताना सकारात्मक राहायला हवे हे मान्य परंतु सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे आक्रमकता नव्हे. इंग्लंडसारख्या जागी खेळपट्टीवर टिकून राहणे हे सुद्धा सकारात्मक ठरते, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

लंडन : फलंदाजी करताना सकारात्मक राहायला हवे हे मान्य परंतु सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे आक्रमकता नव्हे. इंग्लंडसारख्या जागी खेळपट्टीवर टिकून राहणे हे सुद्धा सकारात्मक ठरते, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता या दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून लॉर्डसच्या मैदानावर सुरु होत आहे. त्यापूर्वी कर्णधार विराटने संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

विराट म्हणाला, की भारतीय फलंदाजीवरून आम्ही कोणी चिंतेत नाही आहोत. एका सामन्यानंतर लगेच अंदाज लावणे चुकीचे आहे. मला वाटते भारतीय फलंदाजांनी इतकेच लक्षात ठेवायला पाहिजे, की इंग्लंडमधे चेंडू सतत काहीतरी करत असतो. स्वींग होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यातून इंग्लंडचे गोलंदाज खूप शिस्तपूर्ण मारा करतात. 

लॉर्डसची खेळपट्टी टणक आणि काहीशी कोरडी वाटते आहे. त्यामुळे दोन फिरकी गोलंदाज खेळवायचा मोह पडू शकतो. संघाच्या समतोलाचा विचार करून मग सामन्याच्या दिवशी खेळपट्टीचा शेवटचा खरा चेहरा बघून अंतिम 11 जणांची निवड केली जाईल, असे विराटने सांगितले.

संबंधित बातम्या