पूनम पांडेने 'ब्रा' काढून उडवली पाकची खिल्ली (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 June 2019

पूनम पांडे संबंधित व्हिडिओमध्ये चहा पीत असून, आपला ब्रा काढून दाखवते. कपाऐवजी आपल्या 'ब्रा'मध्ये, डबल डी ब्रा मध्ये आपण चहा प्या, असा सल्ला पाकिस्तानला दिला आहे.

मुंबईः मॉडेल पूनम पांडे हिने 'ब्रा' काढून पाकिस्तानची खिल्ली उडवली असून, ट्विरवर तिने व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ अपलोड करताना, 'पाकिस्तानी जाहिरातीसाठी माझे उत्तर' असे लिहिले आहे.

पूनम पांडे संबंधित व्हिडिओमध्ये चहा पीत असून, आपला ब्रा काढून दाखवते. कपाऐवजी आपल्या 'ब्रा'मध्ये, डबल डी ब्रा मध्ये आपण चहा प्या, असा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. व्हिडिओमधून तिने पाकिस्तानची खिल्ली उडवली असून, पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचा डुप्लिकेट घेऊन विश्वकरंडक 2019 साठी पाकिस्तानने बनवलेली जाहिरात चर्चेत आली आहे. भारतीयांनी या जाहिराती बद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, निषेध केला आहे. पूनम पांडे हिने ही जाहिरात पाहिल्यावर आपला राग व्यक्त केला आहे. राग व्यक्त करण्यासाठी पूनमने आगळी-वेगळी पद्धत अवलंबली आहे. पाकिस्तानला तीने डबल डी ब्रा मधून चहा पिण्याचा सल्ला दिला आहे. पूनम पांडे हिने यापूर्वीही अनेक बोल्ड व्हिडिओ व छायाचित्रे अपलोड केली आहे.

दरम्यान, विश्वकरंडक 2019 साठी भारताने 'मौका-मौका' जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रतिमेचा वापर केला. पाकिस्तानने बनवलेली जाहिरात लज्जास्पद होती. यावर पूनम पांडे हिने सुद्धा आपल्या हटके पद्धतीने ब्रा काढून खिल्ली उडवली असून, पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. नेटिझन्सनही तिच्या व्हिडिओवर व्यक्त होत असून, पाकिस्तानची अधिकच खिल्ली उडवत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या