मैदानात हिरो ठरलात; आता मैदानाबाहेर हिरो घडवा; मोदींचे आवाहन

वृत्तसंस्था
Wednesday, 13 March 2019

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि देशभर राजकीय वारे वाहू लागले. निवडणूकीच्या काळात प्रत्येकजण आपापली कामं वाटून घेतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा देशातील नामवंत खेळाडूंना एक काम सोपविले आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि देशभर राजकीय वारे वाहू लागले. निवडणूकीच्या काळात प्रत्येकजण आपापली कामं वाटून घेतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा देशातील नामवंत खेळाडूंना एक काम सोपविले आहे. 

मोदींनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू, तसेच बॅडमिंटनपटू, भालाफेकपटू अशा अनेकांना देशातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम सोपविले आहे. 

भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांना उद्देशून ''मैदानावरील तुमच्या खेळामुळे तुम्ही अनेकांना प्रेरित केले आहे. आता पुन्हा लोकांना प्रेरित करण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी प्रेरित करा'' अशा आशयाचे ट्विट केले आहे. 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांना उद्देशूनही मोदींनी ट्विट केले आहे. ''खेळपट्टीवरील तुमच्या मोठ्या मोठ्या विक्रमांमुळे अनेकजण प्रेरित झाले आहेत. यावेळी भारताच्या 130 कोटी जनतेला मतदानासाठी प्रेरित करण्याचे काम तुम्ही करायचे आहे. असे झाल्यास लोकशाहीचा विजय होईल,'' असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

यांच्याशिवाय मोदींनी फोगट भगिनी, बजरंग पुनिया, सचिन तेंडुलकर, श्रीकांत किदांबी, पी व्हि सिंधू, साईना नेहवाल, नीरज चोप्रा, योगीराज दत्त, सुशील कुमार यांना उद्देशूनही ट्विट केले आहेत. 

संबंधित बातम्या