Video देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

सिद्धार्थ लाटकर
Friday, 29 November 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 कालावधीत फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ केला. या मोहिमे अंतर्गंत देशातील प्रत्येक नागरीक 2022 पर्यंत तंदुरुस्त बनिवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यातीलच फिट इंडिया सप्ताह एक उपक्रम आहे.
 

सातार : मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबरमध्ये फिट इंडिया चळवळी अंतर्गंत फिट इंडिया सप्ताह साजरा करावा असे आवाहन केले आहे. या काळात शाळांनी क्रीडा स्पर्धा बरोबरच युवकांसाठी निरोगी जीवनाबाबतचे मूलभूत उपक्रम राबवावेत आदी मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत. दरम्यान फिट इंडिया सप्ताहाचे पत्रक नुकतेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश हा तंदुरुस्तीचे महत्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे हा आहे. तंदुरुस्ती हा संस्कृती व परंपरेचा भाग असून तो पूढे नेण्यासाठी विविध मार्गाने अभ्यासता येईल. संस्कृती, रितीरिवाज, सण, नृत्य, सामाजिक मेळावे, आहार पद्धती या मार्गाने तंदुरुस्तीचे विविध घटक कालानुरुप सरावाने आत्मसात करु शकतो. पूरातन काळापासून तंदुरुस्तीला पारंपारिक खेळाचे माध्यमातून शारीररिक सदृढतेसाठी महत्व दिलेले आहे. परंतु तंत्रज्ञानातील प्रगती व आधुनिक जीवनशैली व दिनक्रमामुळे आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होत आहेत. देशात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून आधूनिक जीवनशैलीमुळे विविध व्याधींमुळे ग्रासले जात आहेत.

National Sports Day 2019 : स्वच्छ भारतनंतर आता तंदुरुस्त भारत !

शारीरिक सदृढतेचे महत्व लोकांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे तसेच शारीरिक सदृढतेचा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनविण्यासाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करताना शाळांनी विविध उपक्रम राबवावेत असे सूचित करण्यात आले आहे. यामध्ये शारिरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरावर घेवून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल ऍप द्वारे भरण्यात यावी. फिट इंडिया चळवळी अंतर्गत उपक्रम राबविण्यात येणाऱ्या शाळांसाठी मानांकन तसेच मानके तयार करण्यात आलेली आहेत. शाळांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्रीय सहभाग घेण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयांनी प्रयत्न करावेत. तसेच हे उपक्रम राबविणेबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे सहकार्य घ्यावे अशी सूचना करण्यात आली आहे. 

शाळांनी हे उपक्रम राबवावेत.

1) प्रादेशिक खेळ स्पर्धा.फिटनेस आणि क्रीडा प्रश्नोत्तरी. 
2) विद्यार्थ्यांना योग आणि प्राणायाम शिकवले जाईल. 
3) नृत्य, एरोबिक्‍स, योग मार्शल आर्ट, दोरी वगळणे. 
4) नृत्य, एरोबिक्‍स, योग मार्शल आर्ट, दोरी वगळणे. 
5) व्यायाम, वादविवाद, सिम्पोजियम, क्रीडा मानसशास्त्रज्ञ व्याख्याने. 
6) खेलो इंडिया ऍपद्वारे फिटनेस असेसमेंट आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा होणार आहे.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने 12 ते 18 डिसेंबर कालावधीत क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. तसेच समाजातील प्रत्येक नागरीकाने शारीरिक स्वास्थाकरिता व्यायाम करावा अथवा खेळामध्ये भाग घ्यावा व प्रकृती स्वास्थ राखावे याकरिता केंद्र शासनाने फिट इंडिया चळवळ या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी, सातारा.  


दरम्यान देशातील सीबीएसई शाळांमध्ये फिट इंडिया सप्ताह साजरा हाेऊ लागला आहे. 

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या