INDvsSA : भारताला पहिल्या डावात रोखले तरच थोड्या आशा नाहीतर...

वृत्तसंस्था
Wednesday, 2 October 2019

या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताने पहिल्या सामन्यासाठी अतिंम संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाचा सामना करणे अत्यंत अवघड असल्याचे मत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने व्यक्त केले आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताने पहिल्या सामन्यासाठी अतिंम संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाचा सामना करणे अत्यंत अवघड असल्याचे मत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने व्यक्त केले आहे. 

तगड्या भारतीय संघाचा भारतात मुकाबला करायचे आव्हान सर्वात मोठे आहे. आमच्या संघात गुणवान खेळाडू आहेत फक्त काहींना अनुभव कमी आहे. पहिल्या डावात भारतीय संघाला रोखता आले तरच काहीतरी मजल मारणे आम्हांला शक्य होणार आहे. सर्वात कठीण काम दर्जेदार भारतीय फिरकी गोलंदाजांना तोंड देण्याचे असेल. जम बसेल त्या फलंदाजाला मोठ्ठी खेळी करायची धमक दाखवावी लागेल.

पहिली लढत : 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम
दुसरी लढत : 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे 
तिसरी लढत : 19 ते 23 ऑक्टोबर - रांची


​ ​

संबंधित बातम्या