कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहिती आहेत का ?

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

कसोटी प्रकारात खेळाडूला टिकणे जेवढे कठीण आहे, तेवढेच कसोटीमध्ये फलंदाजी करताना षटकार खेचणे कठीण आहे. परंतु क्रिकेटच्या कसोटी कारकिर्दीत असेही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी, टी20 किंवा एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावले आहेत.  

क्रिकेट या खेळाची सुरवातच कसोटी या प्रकारातून सुरु झाली. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तीनही प्रकारांमध्ये कसोटी प्रकारात टिकणे सर्वात कठीण मानले जाते. पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूची तंदरुस्ती ही सर्वात महत्वाची ठरते. त्यामुळेच क्रिकेट प्रकारातील कसोटी ही  क्रिकेटपटूंची खेळताना एकप्रकारे कसोटी ठरते. कसोटी प्रकारात खेळाडूला टिकणे जेवढे कठीण आहे, तेवढेच कसोटीमध्ये फलंदाजी करताना षटकार खेचणे कठीण आहे. परंतु क्रिकेटच्या कसोटी कारकिर्दीत असेही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी, टी20 किंवा एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावले आहेत.            

ब्रॅडन मॅक्युलम 
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम हा खेळाडू अशांपैकीच एक आहे, ज्याने कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावले आहेत. आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 101 सामने खेळलेल्या ब्रॅडन मॅक्युलम ने 64.6 च्या स्ट्राइक रेट आणि 38.64 च्या सरासरीने 6453 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 12 शतके तसेच 31 अर्धशतकांची नोंद आहे. याचवेळेस ब्रॅडन मॅक्युलमने कसोटीतील या धावा करताना सर्वाधिक 107 षटकार लगावले आहेत.               

अ‍ॅडम गिलक्रिस्ट
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर अ‍ॅडम गिलक्रिस्टने 96 कसोटी सामन्यांमध्ये  47.6 च्या सरासरीने 5570 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. अ‍ॅडम गिलक्रिस्टने आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 100 षटकार मारले आहेत.  

आता फॉर्म्युला वन गाड्यांचा आवाज पुन्हा घुमणार        

ख्रिस गेल
वेस्ट इंडीजचा तुफानी सलामीवीर ख्रिस गेलने आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने 42.2 च्या सरासरीने 7214 धावा केल्या आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये गेलने 98 षटकारांसह 15 शतके आणि 37 अर्धशतके नोंदवली आहेत.
 
जॅक कॅलिस
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणून जॅक कॅलिसची ओळख आहे. कसोटी करिअरमध्ये जॅक कॅलिसने १66 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 13289 धावा केल्या असून, यामध्ये 45 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकूण 97 षटकार  जॅक कॅलिसने कसोटीमध्ये लगावले आहेत. 

क्रिकेट जगताला धक्का, कोरोनामुळे संजय डोबाल यांनी गमावला जीव

वीरेंद्र सेहवाग
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून वीरेंद्र सेहवागची ओळख आहे. सेहवागने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 104 कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांत 8586 धावा केल्या आहेत आणि 91 षटकार लगावले आहेत. यामध्ये कसोटी सामन्यात 23 शतके आणि 32 अर्धशतके सेहवागने झळकावली  आहेत.


​ ​

संबंधित बातम्या