खेळाडूंच्या 'मंडळीं'च्या UAE परवान्यासाठी BCCI हस्तक्षेप करणार नाही, पण..

सुशांत जाधव
Friday, 31 July 2020

2 ऑगस्ट रोजी बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक, सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्वे, सेफ्टी प्रोटोकॉल यासारख्या मुद्यांची माहिती जाहीर करु शकते. युएईमध्ये पोहचण्यापूर्वी कोविड चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य असेल

भारतीय क्रिकेट मंडळ (BCCI) आणि इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) फ्रँचायजी मंडळी लोकप्रिय स्पर्धेच्या 13 व्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये टी-20 मधील लोकप्रिय स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची बैठक दोन दिवसांवर आली असून या बैठकीत आयपीएलच्या वेळापत्रकाचा आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या खेळाडूंच्या चार कोविड-19 टेस्ट घेण्यात येणार असल्याच्या वृत्ताचीही चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंण्डसला  संयुक्त अरब अमिरातमध्ये नेण्याचा निर्णय हा फ्रंचायजीवर सोडण्यात आल्याचेही वृत्त आहे.  

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही

2 ऑगस्ट रोजी बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक, सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्वे, सेफ्टी प्रोटोकॉल यासारख्या मुद्यांची माहिती जाहीर करु शकते. युएईमध्ये पोहचण्यापूर्वी कोविड चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य असेल. यासाठी खेळाडूंची दोन आठवड्यात चार टेस्टला सामोरे जावे लागणार असल्याचे वृत्त आहे. खेळाडूंच्या  पत्नी किंवा गर्लफ्रेंण्ड यांना स्पर्धेवेळी सोबत नेण्यासंदर्भाती निर्णय बीसीसीआय घेणार नसून यासंदर्भातील सर्व अधिकार हे फ्रेंचायजी टीमला देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीच्या सर्व आयपीएल हंगामात खेळाडूंना पत्नी किंवा गर्लफ्रेंण्डला सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणे नाही. जर खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंण्डसोबत असतील तर त्यांनाही प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. त्यांनाही जैविक सुरक्षिततेचे कवच द्यावे लागले. या परिस्थितीत फ्रेंचायजी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जैविक सुरक्षा प्रोटोकॉल निश्चित झाल्यानंतर त्यातून कोणीही बाहेर पडू शकत नाही. खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंण्ड यांना स्पर्धेसाठी परवानगी देण्यासंदर्भात बीसीसीआय कोणताही निर्णय घेणार नाही. स्पर्धेतील संघ मालकच यावर निर्णय घेतील. हा निर्णय कोणताही असो पण जैविक सुरक्षाचे नियमाचे सर्वांनाच पालन करावे लागेल. खेळाडूंच्या बस ड्रायव्हरलाही या नियमाचे बंधन असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. 


​ ​

संबंधित बातम्या