Asian Games 2018 : व्वा! खेळाडू 'इकॉनॉमी'ने आणि अधिकारी 'बिझनेस'ने

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

नवी दिल्ली : इंडोनेशिया येथे नुकत्याच झालेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 69 पदकांची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. मात्र, मायदेशी परतताना भारतीय खेळाडूंबाबत दुजाभाव होताना निदर्शनास आले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना इकोनॉमी क्लासने प्रवास करावा लागला तर त्यांच्यासह गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांना मात्र बिझनेस क्लासने प्रवास केला. 

या स्पर्धेतील अनेक खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या खेळाडूंच्या यशामागे त्यांचे मार्गदर्शक आणि त्यांचे आई वडिल यांचा हात आहे. मात्र या खेळाडूंच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीही पुढे पुढे करुन घेतले. भारतीय पथकाचे उपप्रमुख आर. के. संचेती यांनी मायदेशी परतताना बिझनेस क्लासमधून प्रवास केला तर खेळाडूंनी इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला. 

''आमच्यामुळे ते येथे आहेत. त्याशिवाय त्यांना येण्याचा दुसरा पर्याय नाही. इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यात काहीच त्रास नाही, परंतु अधिकाऱ्यांना अशी विशेष वागणूक मिळणार असेल, तर ती आम्हालाही मिळायला हवी,'' असे मत व्हॉलिबॉल संघातील एका खेळाडूने व्यक्त केले.

​ ​

संबंधित बातम्या