इतिहास आहे साक्षीला; खेळाडू दहशतवादाला घाबरत नाहीत..!

ज्ञानेश भुरे
Friday, 15 March 2019

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येतील अल नूर मशिदीत झालेल्या गोळीबारा दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आलेला बांगलादेश संघातील खेळाडू तेथूनच काही अंतरावर बसमधून उतरत होते. साक्षात मृत्यू त्यांच्यासमोर होता, पण त्याची कल्पना त्यांना नव्हती.

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येतील अल नूर मशिदीत झालेल्या गोळीबारा दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आलेला बांगलादेश संघातील खेळाडू तेथूनच काही अंतरावर बसमधून उतरत होते. साक्षात मृत्यू त्यांच्यासमोर होता, पण त्याची कल्पना त्यांना नव्हती. सुदैवाने एका महिलेला खाली पडताना बघितल्यावर आणि मशिदीतून लोक जीव वाचविण्यासाठी बाहेर येताना दिसल्यावर त्यांना काही तरी घडल्याचे लक्षात आले. काय घडले ते कळत नव्हते. पण, जे घडत होते ते भयानक होते इतकेच ते समजून चुकले आणि सुरक्षा रक्षकांच्या सल्ल्यानुसार वागत राहिले. सर्व जण सुखरूप बचावले. अर्थात, ही पहिली दुर्दैवी घटना नाही की ज्यामुळे क्रीडा क्षेत्र प्रभावित झाले.

दहशतवादाने अगदी शांततेचा संदेश पोचविणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांना देखील सोडलेले नाही हा इतिहास आहे. 
क्रीडा क्षेत्रावर परिणाम करणारा पहिला दहशतवादी हल्ला झाला तो 1972च्या ऑलिंपिक स्पर्धेत. त्या वेळी इस्राईलच्या खेळाडूंना लक्ष्य करण्यात आले होते. मुस्लिम देशातील सत्ता संघर्षाचा झालेला तो पहिला कोप होता. फिलीस्ताईनच्या आठ दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात इस्राईलच्या दोन खेळाडूंची हत्या झाली. त्यानंतर नऊ खेळाडूंना ओलिस ठेवण्यात आले होते. पुढे जाऊन या सर्व खेळाडूंची हत्या करण्यात आली. 

बर्लिमध्ये 1936 मध्ये झालेल्या ऑलिंपिकनंतर 1972 मध्ये पुन्हा जर्मनीत ऑलिंपिक र्स्धांचे आयोजन करण्यात आले होते. इस्राईलमधील वातावरण फारसे चांगले नव्हते. तशाच स्थितीत इस्राईलचे खेळाडू ऑलिंपिकसाठी आले होते. ऑलिंपिकचा पहिला दिवस यथा सांग पार पडला. त्यानंर 4 सप्टेंबरच्या रात्री इस्राईलचे खेळाडू आपल्या खोलीत गेले. साधारण पहाटे 4 वाजता आठ अतिरेक्‍यांनी ऑलिंपिक क्रीडा ग्रामचा ताबा घेतला. सहा फूट भिंत पार करून ते आत घुसले होते. आत प्रवेश केल्यावर ते थेट इस्राईल खेळाडू असलेल्या इमारतीत आले. सावज टप्प्यात यावे तसे या दहशतवाद्यांनी इस्राईली खेळाडू दिसल्यावर गोळीबार करण्यास सुरवात केली. यात दोन खेळाडू मारले गेले, दोघे सुदैवाने पळून जाण्यात यशस्वी ठरले. उरलेले नऊ खेळाडू मात्र त्यांच्या हाती लागले. या दुर्घटनेनंतर एक दिवस ऑलिंपिक खेळ थांबविण्यात आले. त्यानंतर स्पर्धा पार पडली. या हल्ल्यातील आठ दहशतवादी हल्ल्यातील तीन दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या हल्ल्यात मारले गेले. बाकी जणांना अटक करण्यात आले. पण, त्यानंतर लुफ्तांसा विमानाच्या "हायजॅक' घटनेत 29 ऑक्‍टोबर 1972 रोजी जर्मनीने त्या टक केलेल्या उर्वरित दहशतवाद्यांना सोडून दिले होते. 

क्रीडा स्पर्धांना यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. क्रीडा क्षेत्र दहशतवाद्यापासून दूर राहिले. पण, 1987 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना न्यूझीलंड संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना झाल्यावर मायदेशी परतली होती. त्या वेली दहशतवाद्यांनी कोलंबो येथील संघ उतरलेल्या हॉटेलच्या जवळ एक बॉम्ब स्फोट करवून आणला होता. यात 113 व्यक्ती ठार झाल्या. न्यूझीलंड संघ या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणाने दौरा अर्धवट सोडून निघून गेला.

त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटलाच दहशतवादाचा फटका बसला. न्यूझीलंड संघ 2002 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ असाच एक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात 12 व्यक्ती ठार झाल्या. न्यूझीलंड संघ तातडीने दौरा सोडून मायदेशी परतला. 

भारतात सगळे सुरळीत सुरू असताना 26-11-2018 मध्ये दहशतवाद्यांनी मुंबईला लक्ष्य केले. त्या वेळी इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर होता. हा संघ मुंबईतून बंगळूरला रवाना झाला होता. दोन आठवड्यापूर्वी ज्या ताज हॉटेलमध्ये हे खेळाडू उतरले होते, तेथेच दहशतवादी घुसले होते. तेव्हा इंग्लंड संघ भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. तेव्हा दोन सामने रद्द करण्यात आले होते. 

खेळाडूंना थेट लक्ष्य करण्याची घटना 2009 मध्ये पाकिस्तानाच घडली. या वेळी श्रीलंकेचे क्रिकेटपटू लक्ष्य होते. पाकिस्तान-श्रीलंका यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना लाहोरला सुरू होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 3 मार्च 2009 रोजी श्रीलंका संघ मैदानावर जाण्यास निघाला होता. हॉटेल ते मैदान या प्रवासात वाटेतच 12 दहशतवाद्यांनी श्रीलंका खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला चढवला. या हल्ल्यात श्रीलंका संघातील माजी खेळाडू महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि अन्य सहा खेळाडूंना किरकोळ दुखापत झाली. बसबरोबर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा दहशतवाद्यांनी बसवर रॉकेट लॉंचरही डागले होते. पण, त्यांचा नेम चुकला. नशिबानेच श्रीलंका संघातील खेळाडू या हल्ल्यातून बचावले. सर्व खेळाडू सुरक्षित हॉटेलवर पोचले. त्यानंतर श्रीलंका संघाला तातडीने मायदेशी परत बोलाविण्यात आले. तेव्हापासून एकाही संघाने अद्याप पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. या हल्ल्यात सहा जवान आणि आठ व्यक्तींची हत्या झाली. 

पाकिस्तानातील श्रीलंका संघावरील हल्ल्याचा आठवणी अजून पुसल्या जात नाहीत तोच 2010 मध्ये आफ्रिकन नॅशनल करंडक फुटबॉल स्पर्धा दहशतवादाचे लक्ष्य ठरली. या वेळी टोगो संघ केंबिंदा येथील अंगोलन प्रांतातून पुढे जात होती. त्याच वेळी दहशतवाद्यानी गोळीबार करण्यास सुरवात केली. या हल्ल्यात संघाचे सहाय्यक व्यवस्थापन आणि प्रसिद्धि अधिकारी मारला गेला. खेळाडू वाचले. पण, ते स्पर्धा न खेळताच माघारी परतले. यानंतर आता या न्यूझीलंडमधील मशिदीवर झालेल्या हल्ला क्रीडा क्षेत्रावर परिणाम करणारा ठरला.


​ ​

संबंधित बातम्या