बांग्लादेश क्रिकेट संघातील 'या' खेळाडूला झाला कोरोनाचा संसर्ग 

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

बांग्लादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशराफी मुर्तझाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मशराफी मुर्तझाला आरोग्य संदर्भात त्रास जाणवू लागल्याने आज शुक्रवारी कोरोनाची चाचणी घेण्यात आली. आणि या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचे समोर आले आहे.

बांग्लादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशराफी मुर्तझाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मशराफी मुर्तझाला आरोग्य संदर्भात त्रास जाणवू लागल्याने आज शुक्रवारी कोरोनाची चाचणी घेण्यात आली. आणि या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली होती.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग

बांग्लादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशराफी मुर्तझा गेल्या दोन दिवसांपासून तापाने ग्रस्त होता, आणि त्यानंतर आज त्याची कोरोना चाचणी घेण्यात आल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याचे मशराफी मुर्तझाचा लहान भाऊ मोर्सलीन बिन मुर्तझाने सांगितले आहे. तसेच मशराफी मुर्तझा आपल्या ढाका येथील निवासस्थानी विलगीकरणात असल्याची माहिती मोर्सलीन बिन मुर्तझाने दिली आहे. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार मशराफी मुर्तझाच्या कुटूंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. 

सामन्याअगोदर फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळला अन्...

दरम्यान, मशराफी मुर्तझा बांग्लादेशच्या संसदेचे सदस्य असून, कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी मध्ये  मुर्तझाने आपल्या घराजवळ आणि मतदारसंघात सामाजिक कार्य सुरु केले होते. बांग्लादेश क्रिकेट संघातील खेळाडू मशराफी मुर्तझा व्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू नफीज इक्बालला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नफीज इक्बाल हा  बांग्लादेश क्रिकेट संघाचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार तमीम इक्बालचा मोठा भाऊ आहे. तर मागील महिन्यात बांग्लादेश क्रिकेट संघाचे अतिरिक्त प्रशिक्षक आणि प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू अशिकूर रहमानला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. बांग्लादेशात आत्तापर्यंत १ लाख ८ हजार ७७५ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर १ हजार ४२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.    

 

                    

     


​ ​

संबंधित बातम्या