ओह नो, आता ते बोअरिंग पेनल्टी शूट आउट!

वृत्तसंस्था
Saturday, 30 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद फेरीचा पहिला सामना उरुग्वे आणि पोर्तुगालमध्ये होईल, तर अर्जेटिना आणि फ्रान्स या माजी विजेत्यांमध्ये दुसरी लढत होईल.

निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद फेरीचा पहिला सामना उरुग्वे आणि पोर्तुगालमध्ये होईल, तर अर्जेटिना आणि फ्रान्स या माजी विजेत्यांमध्ये दुसरी लढत होईल.

स्पेनमधील 1982 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पेनल्टी शूट आउटचा प्रथम वापर झाला. पेनल्टी शूट आउट सुरू झाल्यापासून त्याचे चाहते कमी असले तरी दुसरा योग्य पर्याय गवसत नसल्याची खंत आहे. 1982 पासून दोन अंतिम आणि पाच उपांत्य लढतीचा निर्णय एक प्रकारची लॉटरी असलेल्या पेनल्टी शूट आउटवर झाला.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात फेरलढतीचा पर्याय होता; पण त्यानंतर नाणेफेकीवर निकाल होण्यास सुरुवात झाली. 1978 च्या स्पर्धेपासून त्याची सुरुवात झाली; पण त्या स्पर्धेत याची गरज भासली नाही. आता याचा फेरआढावा घेताना या पेनल्टी शूट आउटच्या वेळी गोलरक्षकापेक्षाही जास्त दडपणास पेनल्टी किक घेणारा खेळाडू सामोरा जात असतो. त्यामुळे या किकवरील यशाचे प्रमाण कमी आहे, याकडे लक्ष वेधले जाते.


​ ​

संबंधित बातम्या