'पीसीबी'मुळेच ढासळली पाकची क्रिकेट प्रतिमा'

वृत्तसंस्था
Wednesday, 12 June 2019

परदेशी संघ पाकिस्तानात खेळत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा ढासळत आहे, असा टाहो फोडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला बुधवारी त्यांचाच माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाककडून घरचा आहेर मिळाला. स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात योग्य पावले न उचलल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली आणि त्याला पाकिस्तान क्रिकेट मंडळच (पीसीबी) जबाबदार आहे, असे त्याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

कराची ः परदेशी संघ पाकिस्तानात खेळत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा ढासळत आहे, असा टाहो फोडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला बुधवारी त्यांचाच माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाककडून घरचा आहेर मिळाला. स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात योग्य पावले न उचलल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली आणि त्याला पाकिस्तान क्रिकेट मंडळच (पीसीबी) जबाबदार आहे, असे त्याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

इंग्लंडच्या 2010च्या बहुचर्चित दौऱ्यात स्पॉट फिक्‍सिंगमध्ये पाकिस्तानी खेळाडू गुंतल्याची कल्पना "पीसीबी'ला होती, तरी त्यांनी पावले उचलली नाहीत, असे सांगून रझ्झाक म्हणाला,""कर्णधार शाहिद आफ्रिदीने थप्पड लगावल्यावर महंमद अमीरने याची कबुली दिली. स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात सर्वस्वी सलमान बटच सहभागी होता. आपल्याला आफ्रिदीने थप्पड मारल्याचे आणि का हे अमीरनेच आपल्याला सांगितले.'' 

संग व्यवस्थापनात हे सगळे माहित झाल्यावर खरे, तर "पीसीबी'ने प्रकरण "आयसीसी'कडे सोपविण्याऐवजी पहिली कारवाई करायला हवी होती. संशयित तिन्ही खेळाडू आरोप नाकारत असले तरी "पीसीबी'ने त्यांना सकृत दर्शनी दोषी धरून मायदेशी पाठवायला हवे होते आणि एक वर्षाची बंदी घालायला हवी होती. पण, तसे काही घडले नाही. यामुळेच पाकिस्तानची क्रिकेट विश्‍वातील प्रतिमा खऱ्या अर्थाने मलिन झाली.'' 

रझ्झाकचा गौप्यस्फोट... 
-आफ्रिदीला कल्पना दिली. पण, त्याने असे काही नाही. भास अहो असे म्हणून टाळले 
-सलमानने नियोजन कधीच पाळले नाही. 
-तीन, चार चेंडू खेळल्यावरच तो एखादी धाव घ्यायचा 
-काही तरी घडतयं म्हटल्यावर "पीसीबी'ने वाट न बघता कारवाई करायला हवी होती 
-सलमान, अमीर, असिफ यांच्यावर पुढे पाच वर्षाची बंदी आली 
-बंदी उठल्यावर तिघेही खेळण्यास पात्र. पण केवळ अमीरला संधी मिळाली


​ ​

संबंधित बातम्या