World Cup 2019 : पहिला बळी; टीम इंडियातील दोघांचा राजीनामा

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

उपांत्य फेरीतील अपयशानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनात काही तरी बदल होणार याची खात्री होतीच. यात पहिला बळी फिजियो आणि तंदुरुस्ती प्रशिक्षकांचा पडला आहे. उपांत्य फेरीतील पराभवानंतर फिजियो पॅट्रिक फरहात आणि तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : उपांत्य फेरीतील अपयशानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनात काही तरी बदल होणार याची खात्री होतीच. यात पहिला बळी फिजियो आणि तंदुरुस्ती प्रशिक्षकांचा पडला आहे. उपांत्य फेरीतील पराभवानंतर फिजियो पॅट्रिक फरहात आणि तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

फरहार्ट यांचा करार वर्ल्ड कपपर्यंतच होता. बीसीसीआयने या दोघांना करार पुन्हा वाढवून दिला होता. पण दोघांनीही तो वाढवून घेण्यास नकार दिला. 

''भारतीय संघासोबतचा माझा आज शेवटचा दिवस होता. मला जशी कामगिरी हवी होती तशी कामगिरी करू शकलो नाही. भारतीय संघासोबत गेली 4 वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. भारतीय संघाला आणि त्याच्या सपोर्ट स्टाफला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,'' असे फरहार्ट यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या