पठाण बंधूंची कोरोना ग्रस्तांना मोठी मदत, दान केले 4000 मास्क

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

इरफाण पठाण आणि युसूफ पठाण या दोन भावांनी कोरोना व्हायरस विरुध्द जगभर सुरु असलेल्या लढ्यात उडी घेतली आहे.

इरफाण पठाण आणि युसूफ पठाण या दोन भावांनी कोरोना व्हायरस विरुध्द जगभर सुरु असलेल्या लढ्यात उडी घेतली आहे. जगभर या व्हायरसमुळे हजारो लोक जीव गमावत आहेत. अशा अवघड काळात पठाण बंधूनी मदतीचा हात पुढे करत 4000 मास्क गरजूंना वाटले आहेत.

इरफान पठाण याने ट्विटर वर व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते या विषयीची माहिती देत आहेत. त्या व्हिडीओला दिलेल्या कॅपशनमध्ये त्यांनी लिहीलं आहे की, समाजासाठी जे कोणी योगदान देऊ शकतात त्यांनी समोर यावं आणि इतरांना मदत करावी. ही छोटीशी सुरुवात आहे पण आपण सगळे मिळून नक्कीच मोठी मदत करु शकू. त्यांनी हे मास्क त्यांचे वडिल महमूद खान पठाण चॅरिटेबल ट्रस्ट च्या नावाने विकत घेतले आहेत. त्यांचा वापर आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, सिक्यूरीटी गार्ड आशा सर्व गरजूंना करण्यात येणार आसल्याची माहिती युसूफ पठाणने या व्हिडीओत दिली आहे.

इरफान सतत सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बद्दल माहिती देत आसतो. जनता कर्फ्यू च्या वेळी देखील त्याने ट्विट करुन लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगीतले होते. इरफानने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

भारतात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. कोरोना व्हायरसने महामारीचे स्वरुप घेतले आहे. आपल्या देशात कोरोना बाधीतांचा आकडा 400 च्या पुढे गेला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांनुसार जगभरात 3,30,000  लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आजवर जवळपास 14,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या