IPL 2020 : कमिन्सने कोट्यावधी कमाविले अन् गर्लफ्रेंडने लगेच केला 'हा' प्लॅन
यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सच्या गर्लफ्रेंडने आता त्याला मिळालेले पैसे खर्च करण्याचे भन्नाट प्लॅन केले आहेत. तिचे प्लॅन कमिन्सने स्वत: सगळ्यांना सांगितले आहेत.
नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सच्या गर्लफ्रेंडने आता त्याला मिळालेले पैसे खर्च करण्याचे भन्नाट प्लॅन केले आहेत. तिचे प्लॅन कमिन्सने स्वत: सगळ्यांना सांगितले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कमिन्सला कोलकता नाईट रायडर्सने 15.50 कोटी रुपयांना करारबद्ध केले. एवढ्या पैशांचे काय करणार असे एका पत्रकाराने विचारल्यावर तो म्हणाला, ''एवढ्या पैशांचं काय करायचं याची मलाही कल्पना नाही मात्र, माझ्या गर्लफ्रेंडने याची पूर्ण तयारी केली आहे. तिनं आमच्या पाळीव कुत्र्यासाठी नवी खेळणी घेण्याची मागणी केली आहे.''
भारताला मोठा धक्का! आता 'हा' खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहेर
आयपीएलच्या इतिहासातील कमिन्स हा दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक (16 कोटी) बोली युवराजसिंगवर लागली आहे.