..म्हणून मुलीचे नाव ठेवले 'एशियन गेम्स'

वृत्तसंस्था
Tuesday, 21 August 2018

इंडोनेशियामधील एका क्रिडा प्रेमी जोडप्याने आपल्या मुलीचे चक्क एशियन गेम्स असे नामकरण केले आहे. आशियाई स्पर्धा सुरु होण्याच्या एक महिना आधी या मुलीचा जन्म पालेमबांग येथे झाला होता. 

पालेमबांग : इंडोनेशियामधील एका क्रिडा प्रेमी जोडप्याने आपल्या मुलीचे चक्क एशियन गेम्स असे नामकरण केले आहे. आशियाई स्पर्धा सुरु होण्याच्या एक महिना आधी या मुलीचा जन्म पालेमबांग येथे झाला होता. 

आशियाई स्पर्धेच्या आठवणींमध्ये आपली मुलगी रहावी म्हणून तीचे नाव एशियन्स गेम्स ठेवल्याचे उद्घाटन सोहळ्यानंतर तिच्या आई वडिलांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ''आम्ही तीचे पहिले नाव ठरवले होते मात्र शेवटचे नाव ठरत नव्हते. आशियाई स्पर्धी पालेमबांगमध्ये होणे हे अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक असल्याने आम्ही तिला या स्पर्धेचे नाव दिले.'' तिचे पूर्ण नाव अबिदा एशियन गेम्स असे ठेवले आहे. 

मुलीला दिलेल्या नावामुळे तिने मोठे झाल्यावर खेळात कारकिर्द करावी का असे विचारल्यावर तिची आई म्हणाली, '' जर तिची इच्छा असेल तर आम्ही नक्कीच तिला पाठिंबा देऊ. तर वडिलांनी तिनी बॅडमिंटन खेळावे अशी इच्छा व्यक्त केली.

ऑगस्ट 18 ते सप्टेंबर 2 या काळात खेवल्या जाणाऱ्या आशियाई स्पर्धेत 17,000 खेळाडूंचा समावेश आहे. जकार्ता आणि पालेमबांग येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या