पंकज अडवानी पुन्हा जिंकला रे! राष्ट्रीय स्पर्धेत नववे विजेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 11 February 2019

आतापर्यंत पंकजने वरिष्ठ गटात स्नूकर आणि बिलियर्डसमध्ये मिळवून 21 जागतिक आणि 21 राष्ट्रीय विजेतीपदे मिळविली आहेत. महिला विभागात बंगळूरच्या वर्षा संजीव हिने महाराष्ट्राच्या आरांता सॅंचेझ हिचा 4-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

इंदौर : भारताचा आघाडीच्या स्नकूर-बिलियर्डस खेळाडू पंकड अडवाणी याने रविवारी वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्कूनर स्पर्धेत आणखी एक विजेतेपद मिळविले. एकतर्फी झालेल्या सामन्यात त्याने लक्ष्मण रावतचा पराभव केला. 

पंकजने अंतिम फेरीच्या लढतीत युवा रावतचा एकतर्फी लढतीत 6-0 असा पराभव केला. पंकजने या लढतीत रावतला जणू स्नूकरचे धडेच दिले. चौथ्या फ्रेममध्ये एकमात्र फेरी जिंकल्याचे समाधान रावतला मिळाले. पंकजने ही फ्रेम 3-1 अशी जिंकली.

उर्वरित सर्व गेममध्ये पंकजच्या धडाक्‍यापुढे रावतचा निभाव लागला नाही. पंकजने आतापर्यंत 32 राष्ट्रीय विजेतीपदे मिळविली आहेत. यात कुमार गटातील 11, वरिष्ठ गटात बिलियर्डसची 9, सिक्‍स-रेड स्नूकरची तीन आणि स्नूकरमधील नऊ विजेतीपदांचा समावेश आहे.

आतापर्यंत पंकजने वरिष्ठ गटात स्नूकर आणि बिलियर्डसमध्ये मिळवून 21 जागतिक आणि 21 राष्ट्रीय विजेतीपदे मिळविली आहेत. महिला विभागात बंगळूरच्या वर्षा संजीव हिने महाराष्ट्राच्या आरांता सॅंचेझ हिचा 4-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

संबंधित बातम्या