अन् पंड्या बंधूंची झाली सगळ्यांसमोरच भांडणं!

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही हे दोघेही चर्चेत आले आहेत आणि याचे कारण आहे ट्विटरवर झालेली त्यांची गमतीशीर भांडणं. या दोघांनी नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

नवी दिल्ली : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही हे दोघेही चर्चेत आले आहेत आणि याचे कारण आहे ट्विटरवर झालेली त्यांची गमतीशीर भांडणं. या दोघांनी नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

सराव करत असताना हार्दिक पंड्याने कृणाल पंड्याच्या बॉलिंगवर मोठे मोठे शॉट मारले आहेत. सरावादरम्यान हार्दिकने हेलिकॉप्टर शॉटही मारला, तो बॉल कृणालच्या डोक्याच्या अगदी थोडासा वरून गेला. 

हार्दिक पंड्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 'पंड्या विरुद्ध पंड्या, कृणाल हा राऊंड मी जिंकल्यासारखं वाटत आहे. माफ कर... हा बॉल तुझ्या डोक्यालाच लागला असता.' असे ट्विट हार्दिकने केले आहे. 

कृणालनेही दुसरा व्हिडिओ टाकून हार्दिकला प्रत्युत्तर दिलं आहे. या व्हिडिओमध्ये कृणालने टाकलेल्या बॉलवर हार्दिक चकला. तू हा व्हिडिओ का शेअर केला नाहीस, असा प्रश्न विचारत कृणालने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या ट्वेंटी20 मालिकेला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पंड्या बंधू जोरदार सराव करत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या