मेस्सीचा शर्ट जाळल्याने पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांवर बंदी

वृत्तसंस्था
Saturday, 25 August 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्राईलची राजधानी जेरुसलेम येथेच सामना व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले होते. पॅलेस्टाईन नागरिकांनी याला विरोध दर्शविला होता. फिफाच्या या कारवाईनंतर इस्त्राईलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

झ्युरीच : इस्त्राईल आणि अर्जेंटिना यांच्यातील फुटबॉल सामन्यापूर्वी लिओनेल मेस्सीचे नाव असलेला शर्ट पॅलेस्टाईनमध्ये जाळण्यात आल्याने फिफाकडून पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेचे प्रमुख जिब्रील राजोब यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे.

या सामन्याचे यजमानपद हैफाहून जेरुसलेमला हलविण्याचा निर्णय इस्त्राईलने घेतल्यानंतर राजोब यांच्याकडून निदर्शने करण्यात येत होती. पॅलेस्टाईन नागरिकांनी अर्जेंटिनाचा  लिओनेल मेस्सीचे नाव असलेला शर्ट जाऴला होता. त्यावेळी इस्त्राईलविरोधात निदर्शने करण्यात आली होती. यामुळे फिफाने पॅलेस्टाईनच्या फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांवर एक वर्षांची बंदी घालत 20 हजार स्वीस फ्रँकचा दंडही ठोठावला आहे. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या सामन्याशी संबंध न ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्राईलची राजधानी जेरुसलेम येथेच सामना व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले होते. पॅलेस्टाईन नागरिकांनी याला विरोध दर्शविला होता. फिफाच्या या कारवाईनंतर इस्त्राईलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

​ ​

संबंधित बातम्या