Asia Cup 2018 : अफगाणिस्तानची झुंज अपयशी; पाकचा विजय

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

पाकिस्तानने मिळविलेल्या या विजयासाठी अफगाणिस्तानने मात्र त्यांना चांगलेच झुंजविले. 257 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलमीवीर फखर झमान शून्यावरच बाद झाला.

अबुधाबी : अफगाणिस्तानने आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तानला झुंजविले, मात्र विजय दूर राहिला. पाकिस्तानने सुपर फोर सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. 

इमाम उल-हक आणि बाबर आझम यांच्या दीडशतकी भागीदारीनंतर माजी कर्णधार शोएब मलिकने चिवट खेळ करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना हशमतुल्लाह शाहिदी (नाबाद 97) आणि कर्णधार असघर अफघान (67) यांच्या 164 धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने 257 धावा केल्या. 

पाकिस्तानने मिळविलेल्या या विजयासाठी अफगाणिस्तानने मात्र त्यांना चांगलेच झुंजविले. 257 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलमीवीर फखर झमान शून्यावरच बाद झाला. त्यानंतर मात्र इमाम आणि बाबर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी रचली. मात्र चार धावांच्या फरकाने हे दोन्ही खेळाडू माघारी परतले आणि सुस्थितीत असलेला पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर मात्र शोएब मलिकने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. शेवटच्या षटकात पहिला चेंडू निर्धाव गेल्यावर त्याने अफताब आलमला पुढील चेंडूवर षटकार आणि चौकार खेचत विजय मिळवून दिला.

संबंधित बातम्या