भारताचे राष्ट्रगीत गाणारा हा पाकिस्तानी चाहता तुम्ही पाहिला का? (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Monday, 24 September 2018

सोशल मिडीयावर सध्या एका पाकिस्तानी व्यक्तीचा मैदानातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये या पाकिस्तानी प्रेक्षकाने भारताचे राष्ट्रगीत गायल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये या प्रेक्षकाने एका हातात मोबाईल पकडला आहे आणि सगळ्यांसोबत तो 'जन गण मन' चे गायन करताना दिसत आहे. यामध्ये या पाकिस्तानी प्रेक्षकाने भारताविषयी दाखवलेले प्रेम एक प्रकारे दिसत आहे.

दुबई- भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. मैदानातील प्रत्येक घडामोडीवर प्रेक्षकांचे लक्ष असते. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. भारत आणि पाकिस्तानचे प्रेक्षकही यामध्ये पाठीमागे नसतात. दोन्ही बाजूचे प्रेक्षक तितक्याच उत्साहात आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु, आशिया कप स्पर्धेतील एका सामन्यात एक अशी घटना घडली की, ज्यामुळे या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील प्रेक्षकांमध्ये प्रेम निर्माण होईल.

सोशल मिडीयावर सध्या एका पाकिस्तानी व्यक्तीचा मैदानातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये या पाकिस्तानी प्रेक्षकाने भारताचे राष्ट्रगीत गायल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये या प्रेक्षकाने एका हातात मोबाईल पकडला आहे आणि सगळ्यांसोबत तो 'जन गण मन' चे गायन करताना दिसत आहे. यामध्ये या पाकिस्तानी प्रेक्षकाने भारताविषयी दाखवलेले प्रेम एक प्रकारे दिसत आहे.

दरम्यान आशिया कप स्पर्धेतील दोन्ही सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. कालच्या (ता.24) सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करुन आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला आहे. 

संबंधित बातम्या