आफ्रिदी भानावार आला; भारतीय फलंदाजांचे गायले गोडवे!

सुशांत जाधव
Sunday, 2 August 2020

यापूर्वी शाहिद आफ्रिदीने मास्टर ब्लास्टर सचिन संदर्भात खळबळजनक वक्तव्य केले होते. सचिन तेंडुलकर शोएब अख्तरच्या गोलंदाजीला घाबरायचा. तोच नव्हे तर अख्तरचे काही स्पेल प्रतिस्पर्धी फलंदानना धडकी भरवणारे असायचे, असे  शाहिद आफ्रिदीने म्हटले  होते.

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीतून सावरत (COVID-19 Pandemic) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेनंतर इंग्लंड-आयर्लंड यांच्यात दोन एकदिवसीय सामनेही खेळवण्यात आले. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकत इंग्लंडने मालिका खिशात घातली आहे. पाकिस्तानचा संघही इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसह टी-20 मालिका खेळण्यास सज्ज झालाय. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी  (Shahid Afridi) सोशल मीडियावर बॅटिंग करताना दिसतोय.

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शाहिद आफ्रिदीने नुकतेच प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन केले होते. यावेळी त्याने चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी एका क्रिकेट चाहत्याने त्याला भारतीय संघातील कोणता खेळाडू आवडतो? असा प्रश्न विचारला होता. यावर त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा या दोघांचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 50 पेक्षा अधिक सरासरीने धावा करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकवणारा एकुलता एक फलंदाज आहे. या दोन फलंदाजांनी प्रभावित केल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे.  

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

यापूर्वी शाहिद आफ्रिदीने मास्टर ब्लास्टर सचिन संदर्भात खळबळजनक वक्तव्य केले होते. सचिन तेंडुलकर शोएब अख्तरच्या गोलंदाजीला घाबरायचा. तोच नव्हे तर अख्तरचे काही स्पेल प्रतिस्पर्धी फलंदानना धडकी भरवणारे असायचे, असे  शाहिद आफ्रिदीने म्हटले  होते. या वक्तव्यानंतर त्याच्यावर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर आता आफ्रिदी भारतीय फलंदाजांचे गोडवे गातानात दिसतोय. 


​ ​

संबंधित बातम्या