पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणतो 'या'मुळेच आयपीएल स्पर्धा भारताबाहेर  

टीम ई-सकाळ
Saturday, 1 August 2020

बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासने आपले मत मांडले आहे.

ऑस्ट्रेलियात नियोजित यावर्षीची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरू करत, यंदाची स्पर्धा भारताबाहेर अमीरातीत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासने आपले मत मांडले आहे. झहीर अब्बासने आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये अधिक आर्थिक गुंतवणूक झालेली असल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

 पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासने एका वृत्तपत्राशी बोलताना, प्रत्येक देशाच्या क्रिकेट मंडळाला पैसे मिळवण्यासाठी टी -20 सामने खेळवणे आवडते आणि अशा स्पर्धांमध्ये अधिक गुंतवणूक झाली असल्यामुळे फक्त भारतच नाही तर प्रत्येक देश याप्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे झहीर अब्बासने म्हटले आहे. त्यामुळेच बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा अमीरातीत खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत झहीर अब्बासने व्यक्त केले. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने देखील, आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असल्याचे म्हटले होते. वसीम अक्रमने माजी खेळाडू तन्वीर अहमद याच्याशी संवाद साधताना, आयपीएलच्या माध्यमातून मागील पाच-सहा वर्षात मोठी आर्थिक उभारणी करण्यात यशस्वी झाल्यामुळेच ही स्पर्धा सगळ्यात मोठी असल्याचे अक्रमने म्हटले होते. 

यू.एस ओपन मधून जागतिक टेनिसपटू एश्लीग बार्टीची माघार  

दरम्यान, यंदाची ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग खुला झाला. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या संयोजनाची एकेक प्रक्रिया सुरू करण्यास प्रारंभ केली आहे. यंदाचा आयपीएल स्पर्धेचा तेरावा हंगाम युएईमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धा भारताबाहेर होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये आयपीएलचा सातवा हंगाम युएईमध्ये झाला होता. तर, 2009 मध्ये ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.            


​ ​

संबंधित बातम्या