भारतीय संघाला आशिया करंडकात दाखवून देऊ: सर्फराज अहमद

वृत्तसंस्था
Sunday, 12 August 2018

भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजने म्हटले आहे, की आशिया करंडकात आम्ही भारतीय संघाविरुद्ध सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून त्यांना दाखवून देऊ. नुकतेच पाकिस्तान संघाने झिंबाब्वे आणि पाकिस्तान संघांचा पराभव केला आहे.

कराची : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु होण्यास अद्याप वेळ असला तरी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने आताच भारतीय संघाला आव्हान दिले आहे.

भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजने म्हटले आहे, की आशिया करंडकात आम्ही भारतीय संघाविरुद्ध सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून त्यांना दाखवून देऊ. नुकतेच पाकिस्तान संघाने झिंबाब्वे आणि पाकिस्तान संघांचा पराभव केला आहे. आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान या संघांसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, युएई, नेपाळ, ओमान, हाँगकाँग, मलेशिया आणि सिंगापूर या संघांचाही समावेश असेल.

सर्फराज म्हणाला, की भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी आम्ही आतापासूनच व्यूहरचना रचण्यास सुरवात केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी चॅम्पियन करंडक 2017 मध्ये लढत झाली होती. पाकिस्तानने भारताचा अंतिम फेरीत पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारताला आशिया करंडकात असणार आहे. 

संबंधित बातम्या