पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास इच्छुक मात्र...   

टीम ई-सकाळ
Thursday, 23 July 2020

क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या ऍशेस मालिकेच्या सामन्याप्रमाणेच किंवा त्याहून अधिक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा हाय-व्होल्टेज सामना म्हणून पहिला जातो.

क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या ऍशेस मालिकेच्या सामन्याप्रमाणेच किंवा त्याहून अधिक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा हाय-व्होल्टेज सामना म्हणून पहिला जातो. त्यामुळेच जगभरातील अनेक क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. भारत आणि पाकिस्तान प्रतिस्पर्धी म्हणून जेंव्हा मैदानावर उतरतात, तेंव्हा खेळाडूंवर देखील याचा नेहमीच जास्त दबाव असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महत्वाचे सामने सोडल्यास हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानावर उतरले नाहीत. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी, भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट खेळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 

बीसीसीआयच्या आर्थिक पाठबळामुळेच हरभजन सिंगची 'त्या' प्रकरणातून सुटका 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणीचा राहिला आहे. परंतु दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे 2013 पासून भारत आणि पाकिस्तानच्या संघाने कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळल्या नाहीत. यावर पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी एका वेब संवादादरम्यान, पाकिस्तान भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट खेळण्यास तयार असल्याचे सांगितले. पण यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मागे धावणार नसल्याचे  एहसान मणी यांनी म्हटले आहे. भविष्यात बीसीसीआय कडून कधीही विचारणा झाल्यास पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास इच्छुक असल्याचे सांगत मात्र त्यासाठी पीसीबी स्वतःहून पुढाकार घेणार नसल्याचे  एहसान मणी यांनी सांगितले.     

सेरेनाची 2 वर्षाची मुलगी संघाची मालक

शिवाय, पाकिस्तानमधील क्रिकेट सुधारण्यासाठीच पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याला पीसीबीचे अध्यक्ष  म्हणून नियुक्त केल्याचे एहसान मनी यांनी सांगितले. मधल्या काळात एहसान मणी यांच्याकडे आयसीसीचे अध्यक्षपद होते. मात्र त्यावेळेस आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणे हा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट करत, देशाच्या क्रिकेटची सेवा करण्यासाठी अध्यक्षपद स्वीकारल्याचे एहसान मणी यांनी सांगितले.       


​ ​

संबंधित बातम्या