पाकचा इंग्लंड दौरा ठरल्याप्रमाणे होणार; कोण-कोण जाणार हे या तारखेला कळणार...

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रिडा क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर आता कोरोनाची खबरदारी घेत खेळाडू मैदानावर उतरत असतानाच कोरोनाचा धोका पुन्हा उदभवल्याचे काहीसे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील जवळपास दहा खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने इंग्लंडच्या दौऱ्यासाठी एकूण 29 खेळाडूंचा संघ निश्चित केला होता.    

रावळपिंडी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रिडा क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर आता कोरोनाची खबरदारी घेत खेळाडू मैदानावर उतरत असतानाच कोरोनाचा धोका पुन्हा उदभवल्याचे काहीसे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील जवळपास दहा खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने इंग्लंडच्या दौऱ्यासाठी एकूण 29 खेळाडूंचा संघ निश्चित केला होता. 10 खेळाडूंना कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब असली तरी आम्ही यातून सावरुन इंग्लंडला जाऊ असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष वासीम खान यांनी व्यक्त केलाय. 25 जूनला संघातील खेळाडू आणि अधिकारी लाहोरमध्ये एकत्रित येतील. चाचणीचा आणखी एक टप्पा पार पडेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जूनला इंग्लंडला रवाना होणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली जातील, असे वासीम खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी संघात खळबळजनकरित्या 10 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तानंतर दौरा रद्द होणार का? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. वासीम खान यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिलाय. इंग्लंडचा दौरा ठरल्याप्रमाणे होणार असून 28 जूनला पाकिस्तानी संघ इंग्लंडला रवाना होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.       

इंग्लंड दौऱ्यासाठीचा पाकचा निम्मा संघ कोरोना बाधित  

कोरोना काळानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपासून लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना सुरवात होणार आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने देखील इंग्लंड दौरा नियोजित केला होता. या दौऱ्यामध्ये पाकिस्तान इंग्लंड सोबत कसोटी आणि टी-20 चे प्रत्येकी तीन सामने खेळण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने या आगामी दौऱ्यासाठी २९ खेळाडूंचा समावेश केला होता. 

ज्यामध्ये अबिद अली, फखर झमान, इमाम उल हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम (कसोटी उपकर्णधार आणि टी -20 कर्णधार), असद शफीक, फवाद आलम, हैदर अली, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज , शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, सरफराज अहमद , फहीम अशरफ, हरीस रऊफ, इम्रान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, सोहेल खान, उस्मान शिंवरी, वहाब रियाज, इमाद वसीम, काशिफ भट्टी, शादाब खान आणि यासीर शाह या सर्व खेळाडूंना निवडण्यात आले होते. जून महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानचा हा संघ इंग्लंडला रवाना होणार होता.  

मदतीसाठी कोर्टवर उतरले अन जोकोविचसह 'हे' टेनिसपटू कोरोनाच्या जाळ्यात अडकले 
     

मात्र त्यापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये पाकिस्तानच्या दहा खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हैदर अली, हॅरिस रउफ, शदाब खान, फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान व वहाब रियाज हे खेळाडू कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.    

 


​ ​

संबंधित बातम्या