'पाकचा संघ इंग्लंडमध्ये एक सामना जिंकला तरी तो चमत्कार असेल'

सुशांत जाधव
Tuesday, 14 July 2020

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात  5 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान सामने रंगणार आहेत. 5 ऑगस्टला मॅन्चेस्टरच्या मैदानातील कसोटी सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होईल. कसोटीसह पाकचा संघ तीन टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. 

पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहेत. पुढील महिन्यापासून पाक-इंग्लंड यांच्यातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाबाबत माजी गोलंदाज सईद अजमल याने आश्चर्यचकित करुन सोडणारे विधान केले आहे. पाकिस्तान संघाने या दौऱ्यात एक सामन जरी जिंकला तर तो चमत्कारच ठरेल, असे तो म्हणाला आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजमलने संघाला घरचा आहेर दिलाय. पाकिस्तानी संघात युवांचा भरणा आहे. त्यामुळे संघासाठी इंग्लंड दौरा मुश्किल असेल, असे मत त्याने व्यक्त केले. तो म्हणाला की, इंग्लंडविरुद्ध पाकचा संघ मालिका जिंकेल, असे वाटत नाही. जर त्यांनी या दौऱ्यात एक सामना जरी जिंकला तर तो चमत्कारच असेल. पाकिस्तानी असल्यामुळे त्यांनी जिंकावे अशी दुवॉ करेन पण ते अशक्य आहे.

वेस्ट इंडिजच्या संघर्षमय विजयाने क्रिकेटमध्ये आली जान

पाकिस्तानचा संघाची इंग्लंडमधील कामगिरी चांगली आहे. संघात इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत करण्याची क्षमताही आहे. दुसरीकडे विंडीजने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर यजमानांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. इंग्लंड विंडीजसमोर बॅकफूटवर दिसल्यानंतर सईद अजमलचे विधान थक्क करणारे असेच आहे.  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात  5 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान सामने रंगणार आहेत. 5 ऑगस्टला मॅन्चेस्टरच्या मैदानातील कसोटी सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होईल.

क्रीडा संघटनांतही कसे असणार तीस टक्के महिला राज?

त्यानंतर 13 ऑगस्ट आणि  21 ऑगस्टला दुसरा आणि तिसरा कसोटी सामना  साउथहॅम्पटनच्या मैदानात खेळवण्यात येईल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 28 , 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी तीन टी-20 सामने खेळवले जातील.  पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्याला मैदानात उतरण्यापूर्वी 4 ऑगस्टला इंग्लंडचा संघ साउथहॅम्पटमध्ये आयर्लंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा वनडे संघ आणि कसोटी संघ पूर्णता वेगळा दिसू शकतो.  
 


​ ​

संबंधित बातम्या