कोहलीपेक्षा अधिक गुण मिळविणारा पाकिस्तानच्या संघात!

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

संयुक्त अरब अमिराती येथे 15 सप्टेंबरपासून होणाऱ्या आशिया स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपला संघा जाहीर केला आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू इमाद वसिम यो यो चाचणीत नापास झाल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. ​

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे 15 सप्टेंबरपासून होणाऱ्या आशिया स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपला संघा जाहीर केला आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू इमाद वसिम यो यो चाचणीत नापास झाल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. 

तसेच पाकिस्तानने 18 वर्षीय नवोदित वेगवान गोलंदाज शहिन आफ्रिदीला संघात स्थान दिले आहे. पाकिस्तानचे अनुभवी खेळाडू असलेल्या यासिर शहा आणि महंमद हफिज यांची संघात समावेश करण्यात आलेला नाही. 

मिकी आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना पाकिस्तान क्रिकेट संघात तंदुरुस्तीला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच लाहोरमधील ट्रेनिंग कॅम्पमध्ये असलेल्या 18 पैकी 17 खेळाडू यो यो चाचणीत पास झाले. यो यो चाचणीत प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 17.4 गुण मिळवणे अनिवार्य होते. इमाद वसिमला 17.2 गुण मिळाल्याने त्याला संघात देण्यात आले नाही. यो यो चाचणी पार केलेल्या सर्व खेळाडूंपैकी वेगवान गोलंदाज हसन अलीने सर्वाधिक 20 गुण मिळवले आहेत. हे गुण भारताचा कर्णधार विराट कोहलीपेक्षाही जास्त आहेत. 

पाकिस्तानचा संघ : सरफराझ अहमद, फखर झमान, शोएब मलिक, महंमद अमीर, शादाब खान, इमाम उल हक, शान मसूद, बाबर अझम, आसिफ अली, हॅरिस सोहेल, महंमद नवाज, फहिन अश्रफ, हसन अली, जुनेद खान, उस्मान शिनवारी, शाहीन आफ्रीदी 


​ ​

संबंधित बातम्या