पाकच्या 6 गड्यांचे 3 दिवसांत घेतलेल्या सलग 2 टेस्टचे रिपोर्ट आले

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

इंग्लंड दौऱ्यासाठी जाण्याची परवानगी मिळण्यासाठी खेळाडूंचे सलग दोन रिपोर्ट निगेटिव्ह यायला हवेत, अशी अट होती. त्यामुळे हे सहा खेळाडूंचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाकिस्तानी संघातील सहा जणांचा तीन दिवसात दुसऱ्यांदा घेण्यात आलेला कोरोना चाचणी  अहवाल निगेटिव्ह आला आहे. मोहम्मद हाफिज, शादाब खान आणि वहाब रियाज यांचा यात समावेश आहे. सलग दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचा इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाकिस्तानच्या तीन दिग्गजांशिवाय मोहम्मद रिझवान, फखर झमान आणि मोहम्मद इसनेन यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड या सहा जणांना इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची व्यवस्था करणार अल्याचे वृत्त आहे. ही मंडळी 20 जणांच्या इंग्लंड दौऱ्यावर पोहचलेल्या ताफ्यात सहभागी होती.  

चेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी

पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन टी-20 सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिकेला इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात तब्बल दहा जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने क्रिकेट जगतात एकच खळबळ माजली. ज्या खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांच्या शिवाय 20 जणांचा ताफा इंग्लंडला रवाना झाला असून त्यांनी 14 दिवसांच्या क्वारंटाईनचा कालावधी सुरु देखील झाला आहे. दहापैकी काही खेळाडूंनी वैयक्तिक चाचणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर चाचणी प्रक्रियेमध्ये गोंधळ असल्याची चर्चाही रंगली.

द्रविडच्या शब्दा-खातर सचिन-गांगुली जोडगोळीनं घेतली होती माघार

इंग्लंड दौऱ्यासाठी जाण्याची परवानगी मिळण्यासाठी खेळाडूंचे सलग दोन रिपोर्ट निगेटिव्ह यायला हवेत, अशी अट होती. त्यामुळे हे सहा खेळाडूंचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 10 पैकी उर्वरित 4 जणांचे रिपोर्ट सलग दोन वेळा निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. याशिवाय शोएब मलिक अद्यापही संघासोबत नाही. त्यांने आपल्या कुटुंबियांना वेळ देण्यासाठी बोर्डाकडून  खास परवानगी घेतली होती. बोर्डाने त्याला उशीराने संघासोबत जॉइन होण्याची परवानगी दिली असून तो 24 जूलैुपर्यंत संघाच्या ताफ्यात सहभागी होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या