पंतप्रधानांनीच विश्‍वास गमवला  आता 'तुझे' काही खरे नाही... 

वृत्तसंस्था
Monday, 18 November 2019

पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर सर्फराझने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष द्यावे असा सल्ला दस्तुरखुद्द पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. 

लाहोर : भारताला हरवून चॅम्पियन्स करंडक जिंकून देणारा कर्णधार सर्फराझ अहमद आता पाकिस्तान क्रिकेटला नकोसा झाला आहे. कर्णधारपद तर गमावलेच पण तिन्ही प्रकारातील संघातून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर सर्फराझने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष द्यावे असा सल्ला दस्तुरखुद्द पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. 

अरेsss गंभीर, उद्या म्हणशील धोनीनेच इंदूरमध्ये जाऊन जिलेबी खायला सांगितली

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशाचे खापर सर्फराझ अहमदच्या नेतृत्वावर फोडण्यात आले. पण त्याचबरोबर त्याचा स्वतःचा फॉर्मही तळाला गेला होता. त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही पाकिस्तानला धुव्वा उडाला त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सर्फराझला संघात स्थान देण्यात आले नाही. 

Image result for sarfraz ahmed

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमुलाग्र सुधारणा झाली तरच पाकिस्तानचे क्रिकेट सुधारेल असे मत इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधील कामगिरीवरून नव्हे तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर खेळाडूच्या क्षमतेची तपासावी, असे सांगणाऱ्या इम्रान यांनी पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून मिसबा उल हक यांच्या नियुक्तीचे समर्थन केले.


​ ​

संबंधित बातम्या