इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरनंतर पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला जैव-सुरक्षित नियम  

टीम ई-सकाळ
Thursday, 13 August 2020

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज पासून साऊथॅम्प्टन येथील द रोझ बाऊल येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिजने जैव-सुरक्षित नियमाचा भंग केला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धांना मोठा ब्रेक लागला होता. त्यानंतर कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी म्हणून विविध उपाययोजना केल्यानंतर क्रीडा जगत हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. क्रिकेट जगतात देखील वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपासून तब्बल चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली होती. त्यानंतर 5 ऑगस्टपासून इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच मँचेस्टर मधील सामन्यात इंग्लंडने बाजी मारत, पाकिस्तान संघाला धूळ चारली. तर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज पासून साऊथॅम्प्टन येथील द रोझ बाऊल येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिजने जैव-सुरक्षित नियमाचा भंग केला आहे. 

EngvsPak : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना   

कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये क्रिकेट पुन्हा सुरु करताना जैव-सुरक्षित वातावरणाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे खेळाडूंना खबरदारी म्हणून मालिकेदरम्यान जैव-सुरक्षित बबल मधेच राहण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु आगामी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 मालिकेसाठी इंग्लंडमध्ये असलेल्या पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद हाफिजने काल बुधवारी हॉटेलशेजारीच गोल्फ कोर्सला भेट दिली. मोहम्मद हाफिजने या भेटीचा फोटो काल सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटो मध्ये मोहम्मद हाफिज एका गोल्फ खेळणाऱ्या महिलेसोबत दिसत असून, सोशल डिस्टंसिन्गच्या नियमाचा देखील उल्लंघन झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. मोहम्मद हाफिजने जैव-सुरक्षित नियमांचा उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका होत आहे.  

मोहम्मद हाफिजच्या या कृतीनंतर त्याला इतर खेळाडूंपासून अलग ठेवण्यात आले आहे. शिवाय त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल आज गुरुवारी किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वी, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेच्या वेळेस इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने जैव-सुरक्षित नियमाचे उल्लंघन केले होते. यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरवर कारवाई करत दंड देखील ठोठावला होता.          

आगामी टी-20 वर्ल्डकपला धोनीची उपस्थिती इतकी महत्त्वाची नाही ; वाचा कोण म्हणाले असे     

दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत सामना जिंकला होता. त्यानंतर आजपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मालिकेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने इंग्लंडचा संघ मैदानावर उतरेल. तर पाकिस्तानचा संघ मालिकेत टिकून राहण्यासाठी या सामन्यात विजयासह पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानावर येईल. 


​ ​

संबंधित बातम्या