पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह म्हणतो, “मी विराट कोहलीला घाबरत नाही पण..”

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

शाह याच्या नावावर कमी वयात हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे.

विराट कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांच्या मानला जातो, क्रिकेटच्या सर्व प्रकारात कोहलीचे नाव झळकताना आपण सगळे पाहतो, पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह हा भारतीय कर्णधार विराटला गोलंदाजी करण्यासाठी आतुर झाला आहे. शाह याच्या नावावर आजवर सर्वात कमी वयात हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे. यावर्षी 10 फेब्रुवारी रोजी रावळपींडी येथे बांग्लादेश विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात त्याने तीन सलग विकेट घेत हॅट्रिक केली होती त्या वेळी त्याचे वय फक्त 16 वर्ष आणि 359 दिवस होते.  

नसीम शाहने पाकिस्तानात दिलेल्या एका मुलाखतीत क्रिकेटविषयी बोलत असताना सांगीतले की, तो भारतीय कर्णधार विराट कोहलीसमोर गोलंदाजी करण्याची वाट पाहत आहे. त्यापुढे तो म्हणाला की मला कोहलीबद्दल आदर आहे पण मी कोहलीला घाबरत नाही. “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच विशेष असतो, पण मला सांगण्यात आलं आहे की या सामन्यामघ्ये खेळाडू हिरो किंवा विलन बनू शकतो. तसेही भारत-पाक सामना जास्त वेळा होत नाही त्यामुळे ते खास असतात. जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारताविरोधात खेळण्यास तयार आहे.” असे मत वेगवान गोलंदाज नसीम याने सांगीतले.

धोनीच्या निवृत्तीबद्दलचं ट्विट डिलीट का केलं? अखेर साक्षीनेच सांगीतले कारण..

त्यापुढे तो म्हणाला की, “भारतीय संघाविरोधात खेळत असताना चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल, संधी मिळाली तर चाहत्यांना नक्कीच नाराज करणार नाही. राहिला प्रश्न विराट कोहली याचा तर, मी त्याचा आदर करतो, पण मी त्याला घाबरत नाही.” कोसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा शाह हा चौथा पाकिस्तानी गोलंदाज आहे, त्याच्या आधी मोहम्मद समी, अब्दुल रज्जाक यांनी एक वेळा तर वसीम अकरम याने दोन वेळा कोसोटी क्रिकेट सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या