कसाही खेळाला तरी पाकला सर्फराजच लाडका

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

श्रीलंका दौऱ्याविषयीच्या अडचणी कायम असल्या तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शुक्रवारी एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचे नेतृत्व सर्फराज अहमदकडे कायम ठेवले. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर त्याच्या कर्णधारपद काढून घेतले जाईल असे मानले जात होते.

लाहोर - श्रीलंका दौऱ्याविषयीच्या अडचणी कायम असल्या तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शुक्रवारी एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचे नेतृत्व सर्फराज अहमदकडे कायम ठेवले. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर त्याच्या कर्णधारपद काढून घेतले जाईल असे मानले जात होते. मात्र, निवड समितीने पुन्हा एकदा सर्फराजवर विश्‍वास दाखवला. बाबर आझम याला उपकर्णधार करण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या