पाकिस्तानचा कर्णधार म्हणतो.. भारताला हरवायचं असेल, असं करा..!

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

दुबई : आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. भारताविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने संघातील सर्व खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करण्याचा सल्ला दिला आहे. 

पाकिस्तानच्या संघाने आशिया करंडकातील हाँग काँगविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवला. भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी संघातील काही खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचेही त्याने सांगितले.

तो म्हणाला, ''खेळाडूंनी काही गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे कर्णधार म्हणून मला जाणवले. आम्ही फक्त एक गडी गमावून किंवा एकही गडी न गमवता हाँग काँगविरुद्धचा सामना जिंकू शकलो असतो. तसेच नवीन बॉल स्विंग होत नाही ही आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. भारताविरुद्ध जिंकायचे असेल तर आम्हाला तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करावीच लागणार आहे.''

हाँग काँगचा कर्णधार अंशुमन राठ याने पाकिस्तानविरुद्धच्या पराभवासाठी फलंदाजीला जबाबदार धरले आहे. ''आमचे फलंदाज फार चुकीच्या पद्धतीने बाद झाले. आमच्याकडे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहेत मात्र 120 धावा आव्हानात्मक नव्हत्या,'' असे त्याने स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या