स्विंग ऑफ सुलतान अन्...सचिनसोबतचा खास किस्सा

टीम ई-सकाळ
Wednesday, 3 June 2020

याच स्वभामुळे पुढे जाऊन सचिन मोठा खेळाडू होईल असे जाणवले होते, असा किस्साही वसीम अक्रम यांनी शेअर केला होता. 

पुणे : नव्वदच्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा दबदबा विलक्षण असाच होता. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची फलंदाजीसह गोलंदाजीची फळी अतिशय भक्कम होती. जगातील सर्वात उत्तम वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू यांचा समावेश त्यांच्या ताफ्यात होता. पाकिस्तानच्या क्रिकेट  वसीम अक्रम, अब्दुल कादिर, वकार युनिस, सकलेन मुश्ताक अशी तगडी गोलंदाजांची फळी पाकिस्तानच्या संघात होती. वसीम अक्रमच्या वेगवान तीक्ष्ण माऱ्याने सर्वांनाच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. 

यंदाच्या आयपीएलसाठी धोनी खूपच खास तयारी करत होता : सुरेश रैना 

भारताचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतीला सुरुवात केल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल. याच वेळी वसीम अक्रमने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगतात एकच दहशत निर्माण केली होती. सचिन तेंडुलकर आणि वसीम अक्रम हे मैदानावर प्रतिस्पर्धी म्हणून जितक्या आवेशाने भिडले तितकेच त्यांची केमिस्ट्री मैदानाबाहेर देखील मैत्रीच्या रूपाने पाहायला मिळाली. मात्र पहिल्यांदा जेव्हा सचिन आणि वसीम अक्रम मैदानावर भिडले त्यावेळीचा किस्सा अफलातून असाच होता. एका कार्यक्रमामध्ये खुद्द वसीम अक्रमने या आठवणींना उजाळा दिला होता. 
सचिनच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच पाकिस्तानच्या संघात सचिनबद्दल चर्चा झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी सचिनला आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी कसे निवडले असा प्रश्न आम्हाला पडला होता, असे अक्रम यांनी सांगितले होते. याशिवाय सचिन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा त्याला चिथावण्याचा प्रयत्न केल्याचे देखील वसीम अक्रमने कबुल केले होते.  

'सुन्या सुन्या मैफली'त रंग भरण्यास भारतीय क्रिकेट सज्ज; पण...

सचिनला चिथावण्यासाठी गोलंदाजीसोबतच शब्दांचा मारा देखील केल्याचे वसीम अक्रमने यावेळी सांगितले. मात्र सचिनने यास कोणताही प्रतिसाद न देता आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले होते व त्याच्या याच स्वभामुळे पुढे जाऊन सचिन मोठा खेळाडू होईल असे जाणवल्याचे वसीम अक्रम सांगितले. कारण उत्तम फलंदाजी करणारे खेळाडू कधीच गोलंदाजाच्या चिथावणीवर लक्ष देत नाहीत आणि सचिनने नेमके तेच केले असा किस्सा वसीम अक्रम यांनी शेअर केला होता.  सचिन तेंडुलकरने आपल्या पदार्पणातील पहिल्या कसोटी सामन्यात 24 चेंडूत 15 धावा केल्या होत्या.      
2003 मध्येच वसीम अक्रमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. वसीम अक्रमने 356 एकदिवसीय सामन्यात 502 विकेट्स घेतल्या आहेत. तर  104  कसोटीत त्याच्या नावे 415 विकेट्स  आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा गाठणारा वसीम अक्रम हा पहिला गोलंदाज होता. यानंतर हा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने मोडला. मुथय्या मुरलीधरन एकदिवसीय क्रिकेटमध्ये 543 विकेट्स मिळवल्या आहेत.

या कारणामुळे स्मिथने दोन महिन्यापासून बॅटला हातही लावला नाही

ऑक्टोबर 2013 मध्ये विस्डेन क्रिकेटर्सच्या वर्धापन दिनानिमित्ताने जाहीर झालेल्या संपूर्ण वेळ कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळविणारा वसीम अक्रम हा एकमेव पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू होता. तसेच त्याला स्विंग ऑफ सुलतान या नावाने देखील ओळखले जाते. वसीम अक्रम हा डावखुरा वेगवान गोलंदाजांपैकी आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणला जातो. वसीम अक्रमचा जन्म 3 जून 1966 ला लाहोर येथे झाला. वसीम अक्रमचे वडील चौधरी मुहम्मद अक्रम हे मूळचे भारतातील अमृतसर जवळच्या खेड्यातील रहिवाशी होते.  1947 च्या विभाजनानंतर ते पाकिस्तानच्या पंजाबमधील कामोंकी येथे गेले. वयाच्या फक्त 30 व्या वर्षी वसीम अक्रमला मधुमेहाचे निदान झाले होते.


​ ​

संबंधित बातम्या