सानिया, शोएबच्या गुफ्तगूने आमीरचा पत्नीसाठी नवा लूक

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

आमीरने ट्विटरवर याबाबतचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की शोएब आणि सानिया तुमच्या गुफ्तगूमुळे माझ्या पत्नीलाही नवी आयडीया दिली आहे. माझ्या प्रेमासाठी मी नवा लूक करत आहे आणि 'बेगम जो बोलो वो हमेशा राईट'. आमीर सध्या युएईमध्ये असून, आशिया करंडकासाठी लढत होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत 19 सप्टेंबरला होणार आहे.

दुबई : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलेल्या संदेशाची चर्चा सुरु असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद आमीरनेही पत्नीसाठी नवा लूक केला आहे.

आमीरने ट्विटरवर याबाबतचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की शोएब आणि सानिया तुमच्या गुफ्तगूमुळे माझ्या पत्नीलाही नवी आयडीया दिली आहे. माझ्या प्रेमासाठी मी नवा लूक करत आहे आणि 'बेगम जो बोलो वो हमेशा राईट'. आमीर सध्या युएईमध्ये असून, आशिया करंडकासाठी लढत होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत 19 सप्टेंबरला होणार आहे.

सानिया मिर्झा सध्या गरोदर असून तिचा पती, पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक सध्या आशिया करंडक स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्याच्या आठवणीत तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती. त्याला प्रतिक्रीया देत शोएबनेसुद्धा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. याची सोशल मिडीयात खूप चर्चा झाली होती.

संबंधित बातम्या