आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील 'या' खेळाडूला झाला कोरोनाचा संसर्ग

टीम ई-सकाळ
Saturday, 13 June 2020

पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील तौफिक उमर आणि जफर सरफराज या खेळाडूंना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले होते.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. शाहिद आफ्रिदीने आपल्या ट्विटर या सोशल माध्यमावर ट्विट करून आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील तौफिक उमर आणि जफर सरफराज या खेळाडूंना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा तिसरा खेळाडू आहे, ज्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

धोनीसारखं मला कधीच जमलं नाही : राहुल द्रविड      

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आज शनिवारी ट्विटरवर ट्विट करत, गुरुवार पासूनच अस्वस्थ वाटल्याने आणि शरीर दुखत असल्याने कोरोनाची चाचणी केल्याचे म्हटले आहे. व दुर्देवाने कोरोनाच्या चाचणीचा हा अहवाल सकारत्मक आला असल्याचे म्हणत, शाहिद आफ्रिदीने बरे होण्यासाठी सर्वांच्या सदिच्छेची गरज असल्याचे या ट्विटमध्ये लिहिले आहे. यापूर्वी तौफिक उमर आणि जफर सरफराज या खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर त्यांचे कोरोना अहवाल नकारात्मक आले होते. तसेच स्कॉटलंडचा क्रिकेटपटू माजिद हक आणि दक्षिण आफ्रिकेचा सोलो नक़्वेनी या खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'

दरम्यान, कोरोना विषाणूच्या जागतिक उद्रेकानंतर लागू करण्यात टाळेबंदीच्या काळात शाहिद आफ्रिदीने त्याच्या फाउंडेशन मार्फत सामाजिक कार्य सुरु केले होते. त्यावेळी त्याने ट्विटरवरून ट्विट करत, भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंग या दोघांना आपल्या सामाजिक फाउंडेशनला मदत करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याची विनंती केली होती.           
 


​ ​

संबंधित बातम्या