ऐकावे ते नवलच...@पाकिस्तानी क्रिकेटर्ससमोर वास्तव्याचे भीषण 'वास्तव'

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 June 2020

क्रिकेट जगतातील स्थिती देखील पुढील काही दिवसांमध्ये सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात होईल,या दिशेने पावले उचलली जात आहेत.  अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची स्थिती अतिशय खराब झाली आहे.

इस्लामाबाद : कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर तब्बल दोन ते तीन महिन्यांनी क्रीडा क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. क्रिकेट जगतातील स्थिती देखील पुढील काही दिवसांमध्ये सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात होईल,या दिशेने पावले उचलली जात आहेत.  अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची स्थिती अतिशय खराब झाली आहे. एका बाजूला प्रत्येक देशातील क्रिकेट मंडळ आपल्या खेळाडूंसाठी सराव शिबिरांचे आयोजन करत आहे. मात्र पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सरावासाठी क्रिकेट मंडळाला जागाच उपलब्ध नाही. सराव शिबीरासाठी येणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याची सोय करण्यात पाक क्रिकेट बोर्ड असक्षम आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सराव शिबिरावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

खेलरत्न पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

कोरोनाच्या साथीमुळे खबरदारीचा पर्याय म्हणून जगातील सर्वच देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर आता जनजीवन पुन्हा सुरळीत चालू करण्याचे प्रयत्न होत आहेत. क्रिकेट जगत देखील पुन्हा सुरु होत असल्याने प्रत्येक देशातील क्रिकेट मंडळाने आपल्या आगामी सामन्यांसाठी सराव शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यामुळे खेळाडू पुन्हा मैदानावर येत सरावास सुरवात करत असल्याचे चित्र आहे. मात्र पाकिस्तानमधील परिस्थिती बरोबर उलट आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने इंग्लंडच्या प्रस्तावित दौर्‍यासाठी मान्यता दिली आहे. ज्यामध्ये तीन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेनं याठिकाणी रंगणार 'फॉर्म्युला वन रेस'चा थरार, पण...

ॉया दौऱ्याच्या आधी खेळाडूंसाठी सराव शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला होता. परंतु सराव शिबिराच्या ठिकाणी खेळाडूंना थांबण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे समजते. अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने होत नसल्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची स्थिती अत्यंत खराब आहे. आणि आता सराव शिबिराच्या जागेच्या कमतरतेमुळे खेळाडू आणि अधिकारी यांना कुठे थांबवायचे हा बिकट प्रश्न सध्या पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला पडला आहे. यापूर्वीच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने कोणत्याही परिस्थितीत भारताच्या क्रिकेट नियामक मंडळाकडून मदत घेण्याचे नाकारले आहे.


​ ​

संबंधित बातम्या