हमी घेतो तुम्ही या ; इंग्लंडला पाकचा प्रस्ताव 

टीम ई-सकाळ
Tuesday, 4 August 2020

एहसान मणी यांनी एका मुलाखती मध्ये बोलताना, पाकिस्तान हा क्रिकेटसाठी सुरक्षित असल्याचे सांगत, इंग्लंडला पाकिस्तान दौरा करण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या संकटातून सावरत मागील महिन्याच्या 8 जुलै पासून इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्या बुधवारी 5 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ देखील यजमान इंग्लंड विरुद्ध तीन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र पाकिस्तानच्या या इंग्लंड दौऱ्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (ईसीबी) परस्पर दौर्‍यासाठी करार करू शकला नाही. त्यामुळे पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी एका वेबसेमिनार दरम्यान, इंग्लंड 2022 मध्ये पाकिस्तान दौरा करून या सध्याच्या पाकिस्तान इंग्लंड दौऱ्याची परतफेड करेल असा विश्वास व्यक्त केला होता. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांच्या या वक्तव्यावर, पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी मात्र इंग्लंडच्या आगामी परदेशातील दौर्‍याचा फायदा घेण्यासाठी पीसीबी सध्याच्या इंग्लंड दौर्‍याचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. एहसान मणी यांनी एका मुलाखती मध्ये बोलताना, पाकिस्तान हा क्रिकेटसाठी सुरक्षित असल्याचे सांगत, इंग्लंडला पाकिस्तान दौरा करण्याचे आवाहन केले. परंतु त्यासाठी एहसान मणी यांनी पाकिस्तानच्या सध्याच्या इंग्लंड दौर्‍याचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. परंतु क्रिकेटने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले.

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

याशिवाय, एहसान मणी यांनी आपण पीसीबीचे अध्यक्ष झाल्यापासून इंग्लंडशी चर्चा करत असल्याचे या मुलाखतीत सांगितले. तसेच जगातील कोणतीही जागा धोकामुक्त नाही. परंतु सर्व गोष्टी समान असून, इंग्लंड पाकिस्तानच्या दौऱ्यावर का येऊ शकत नाही हे कळत नसल्याचे एहसान मणी यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त पीसीबी अध्यक्षांनी इंग्लंडचा पाकिस्तान दौरा झाला तर क्रिकेट जगतासाठी ही गोष्ट मोठे उदाहरण ठरणार असल्याचा दावा केला. मणी यांनी लोकांना देशाबद्दलची आपली धारणा बदलण्यास सांगितले आणि एकदा पाकिस्तानला भेट देण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे तर, युवा खेळाडू पाकिस्तान मध्ये कसोटी क्रिकेट होत नसल्याबद्दल नेहमीच विचारणा करत असल्याचे मणी यांनी या मुलाखतीत सांगितले. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

दरम्यान, 2009 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जगभरातील कोणताही क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ओहोटी लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आणि याचा विपरीत परिणाम देखील पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळावर होत असून, दिवसेंदिवस पीसीबीची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.     

 


​ ​

संबंधित बातम्या