4-3-1-2 असा आहे इरफानचा अप्रतिम स्पेल

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेत इरफानने ही अप्रतिम कामगिरी करून दाखविली आहे. बार्बाडोस ट्रायडन्टस संघाकडून खेळताना त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, त्याच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. 

सेंट किट्स : पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफान याने ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वांत अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्याने टाकलेल्या 4 षटकांमध्ये तीन षटके निर्धाव टाकून अवघी एक धाव देत 2 बळी मिळविण्याची कामगिरी केली आहे.

वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेत इरफानने ही अप्रतिम कामगिरी करून दाखविली आहे. बार्बाडोस ट्रायडन्टस संघाकडून खेळताना त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, त्याच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. 

सहा फुटांहून अधिक उंची असलेला पाकिस्तानचा हा गोलंदाज सध्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये खेळत आहे. इरफानचे पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलला बाद केले. त्यानंतर त्यानंतर त्याने इव्हिन लुईसलाही बाद करत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. त्याने आपल्या स्पेलमध्ये 23 चेंडू निर्धाव टाकले. 

​ ​

संबंधित बातम्या