पाकिस्तानच्या सलामीवीराने केले चेंडू कुरतडण्याचे महापाप

वृत्तसंस्था
Friday, 1 November 2019

इस्लामाबाद : पाकिस्तानचा फलंदाज अहमद शेहजाद याने चेंडू कुरतडण्याचा प्रकार केला आहे. पाकिस्तानात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या कुएद ए आझम करंडक सुरु आहे. यामध्ये तो सेंट्रल पंजाब संघाचे कर्णधारपद भूषवितो. या मालिकेत सिंध संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने चेंडू कुरतडल्याचे समोर आले आहे. 

गांगुली-द्रविडने रचला डाव; शास्त्रींवर दिली 'ही' नवी जबाबदारी

Related image

इक्बाल स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात त्याने हा प्रकार केला. त्याच्यावर आज कारवाई केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला ट्विटरवरुन दुजोरा दिला. 

अहमदचे स्वत:चे करिअर सध्या ट्रॅकवर नाही. पाकिस्तानने चॅम्पियन्स करंडक जिंकला त्या संघात तो होता. मात्र, त्यानंतर खराब कामगिरी केल्याने त्याने संघातील स्थान गमावले. त्याने ऑक्टोबर 2017मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आहे.  

​ ​

संबंधित बातम्या