Asia Cup 2018 : मांजरेकर म्हणतात, पाकिस्तानच फेव्हरेट

वृत्तसंस्था
Wednesday, 19 September 2018

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवाऱ) लढत होत असून, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात येत असताना मांजरेकर यांनी पाकिस्तानचा संघ प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले आहे.

दुबई : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आशिया करंडक स्पर्धेचा विजेता म्हणून पाकिस्तानचा संघच प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवाऱ) लढत होत असून, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात येत असताना मांजरेकर यांनी पाकिस्तानचा संघ प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले आहे.

मांजरेकर म्हणाले, की संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. पाकिस्तान याठिकाणी सतत क्रिकेट खेळते. पाकिस्तानने या स्पर्धेची सुरवात भारतापेक्षा सरस खेळ करून केली आहे. येथील हवामानाचा त्यांना अंदाज आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतापेक्षा पाकिस्तानचा संघ मजबूत वाटतो.

​ ​

संबंधित बातम्या