पाकच्या या क्रिकेटरला टीम इंडियाच्या ताफ्यासोबत फिरायचंय

टीम ई-सकाळ
Saturday, 6 June 2020

एका मुलाखतीमध्ये त्याने क्रिकेटच्या भविष्यातील कारकिर्दीबाबत भाष्य केले. यावेळी त्याने पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवरही निशाणा साधला.

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप करत पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूला भारतीय संघाच्या ताफ्यासोबत फिरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हावे अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून पाकच्या संघात खेळलेला एकमेवर हिंदूधर्मीय क्रिकेट असणारा दानेश कानेरिया हा आहे.  

...म्हणून मेस्सीचं 'विलगीकरण' प्रॅक्टिस

एका मुलाखतीमध्ये त्याने क्रिकेटच्या भविष्यातील कारकिर्दीबाबत भाष्य केले. यावेळी त्याने पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवरही निशाणा साधला. शाहिद आफ्रिदी हा स्वत: लेग स्पिनर होता. त्यामुळ घरच्या मैदानावर तो दुसऱ्या कोणत्याही लेग स्पिनरला संघात स्थानच द्यायचा नाही, असा आरोप त्याने केला. पाकच्या संघात भेदभाव अनुभवल्याचेही त्याने यावेळी सांगितले. माझ्यावर बंदी घालण्यासाठी पाकिस्तानी मीडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला साथ दिली होती, असे त्याने म्हटले आहे. मी अजूनही खेळण्यास उत्सुक असल्याचेही त्याने बोलून दाखवले.  

# वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

तो पुढे म्हणाला की, क्रिकेटच्या मैदानात मला प्रशिक्षकाची भूमिका बजवायला आवडेल. यासाठी मी भारत किंवा बांगलादेश संघाला प्राधान्य देईन, असेही तो म्हणाला. याशिवाय त्याने समालोचक म्हणून काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त करणाऱ्या दानेश कानेरियाने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांबद्दल असणारे प्रेम कायम राहिल असेही सांगितले. यावेळी त्याने भारताचे नागरिकत्व स्वीकारण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. पाकिस्तानचा जलगती गोलंदाज शोएब अख्तरने पाक संघाने दानेश कानेरियासोबत भेदभाव केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आम्ही काही बोललो असतो तर आम्हाला दोघांना संघातून बाहेर काढले असते असेही अख्तरने म्हटले होते. अख्तरच्या या गौफ्यस्फोटानंतर दानेश कानेरिया चांगलाच चर्चेत आला होता.  

अखेर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल युवराजने माफी मागीतली

दानेश कानेरिया पाकिस्तानच्या आघाडीच्या फिरकीपटूंपैकी एख आहे. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटदरम्यान मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्याची कारकिर्द अडचणीत आली. या प्रकरणात पाकिस्तानने त्याच्यावर क्रिकेटची आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.  पाकिस्तानमध्ये इतर खेळाडू मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर संघात आले पण दानेश कानेरियाला ती संधी मिळाली नाही. पाकिस्तानच्या ही भूमिका दुटप्पी वाटावी अशीच आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या