जपान ओपन बॅडमिंटन : सिंधूची हार, पण प्रणीतचा दिलासा

वृत्तसंस्था
Friday, 26 July 2019

 पी व्ही सिंधूचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. साई प्रणीतने टॉमी सुगिआर्तो याला पराजित करताना त्याच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची मालिका सुरु ठेवली. 

मुंबई : पी व्ही सिंधूचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. साई प्रणीतने टॉमी सुगिआर्तो याला पराजित करताना त्याच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची मालिका सुरु ठेवली. 

इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील अंतिम लढतीप्रमाणेच तिला जपान ओपन स्पर्धेत अकेन यामागुचीविरुद्धच्या लढतीत दोन गेममध्येच हार पत्करावी लागली. सिंधूला यामागुचीच्या घरच्या कोर्टवर 18-21, 15-21 अशी पराजित झाली.

त्याचबरोबर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराजलाही दुहेरीत हार पत्करावी लागली.  प्रणीतने 21-12, 21-15 असा विजय मिळवत स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखले. पहिल्या गेममधील 0-1 माफक पिछाडी सोडल्यास प्रणीत संपूर्ण लढतीत कधीही मागे पडला.

संबंधित बातम्या