French Open Badminton :  उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासह सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप

वृत्तसंस्था
Friday, 26 October 2018

फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंधूने जपानच्या सायाका सोटाला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या 21-17, 21-16 अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.

पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंधूने जपानच्या सायाका सोटाला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या 21-17, 21-16 अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. या विजयासह तिने जागतिक क्रमवारीतही प्रगती केली आहे. सिंधूने तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

एप्रिल 2017 मध्ये सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले होते. त्यानंतर तिच्या क्रमवारीत घसरण झाली. सप्टेंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी तिने पुन्हा हे स्थान मिळवले मात्र त्यानंतर ती तिसरऱ्या स्थानावर होती. चायनीज तैपेईची ताय झू यिंग अव्वल स्थानावर आहे. 

डेन्मार्क ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत गाठणाऱ्या साईनाने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुष एकेरीमध्ये श्रीकांतने सहावा क्रमांक कायम राखला आहे तर समीर वर्माने 18 व्या स्थानावर झेप घेतली आहे. एच एस प्रणोय आणि बी साईप्रणित हे अनुक्रमे 17 व्या आणि 48 व्या क्रमांकावर आहेत.

संबंधित बातम्या