करोनाग्रस्तांसाठी सिंधूने दिले 10 लाख

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन टोक्यो येथे नियोजित असलेली ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी घेण्यात येणार आहे. 

जगभरातील देश कोरोना व्हायरस विरोधात लढत आहेत, क्रिडा विश्वातल्या अनेक दिग्गजांना आर्थिक स्वरुपाची मदत त्यासाठी केली आहे. विश्व चॅम्पियन बॅडमिंटनपटू पि. व्ही सिंधूने कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी समोर आली आहे. सिंधूने  तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या मुख्यमंत्री रिलीफ फंड मध्ये प्रत्येकी पाच लाखांची मदत केली आहे. 

भारतात सहाशे पेक्षा जास्त नागरीकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे तर तेरा जणांनी त्यांचे या महारोगात प्राण देखील गमावले आहेत. त्यामुळेच भारतात 21 दिवसांसाठी देश बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधूने ट्विट करुन माहिती दिली की, ‘ मी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या मुख्यमंत्री रिलीफ फंड मध्ये जमा करत आह.’  रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर पदक जिंकले असल्याने सिंधू यावर्षीच्या ऑलिम्पिक खेळण्यासाठी पात्र होती. पण कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन टोक्यो येथे नियोजित असलेली ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी घेण्यात येणार आहे. 

कोरोनामुळे आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर

कोरोना व्हायरसमुळे जगभरात आजवर 21000 लोक मारले गेले आहेत, तर लोखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या सगळ्या क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या