दडपणाविना खेळल्याचा सिंधूला फायदा : गोपीचंद 

वृत्तसंस्था
Friday, 21 December 2018

नव्या वर्षात ऑलिंपिक पात्रता निश्‍चित होईल. रिओपेक्षा जास्त स्पर्धक टोकियोसाठी पात्र ठरणे मलाही आवडेल, पण स्पर्धा खूपच खडतर आहे. त्यामुळे हे नक्कीच कठीण दिसत आहे. स्पर्धा वाढल्या आहेत, त्यातील सातत्य महत्त्वाचे आहे. दुहेरीसाठी पात्रता जास्त अवघड आहे. 
- पुल्लेला गोपीचंद 

मुंबई : वर्ल्ड सिरीज स्पर्धेच्या वेळी सिंधू ताजीतवानी होती, तिच्यावर कसलेही दडपण नव्हते. त्याचा तिला या स्पर्धेत खूपच फायदा झाला. याआधी जास्त थकल्यामुळेच तिला पराभव पत्करावे लागले होते, असे गोपीचंद यांनी सांगितले. 

सिंधूने विजेतेपदाचा दुष्काळ संपवला किंवा पराभवाच्या फेऱ्यातून ती बाहेर पडली, असे म्हणणे चुकीचे आहे; हे तिच्यावर अन्यायकारक होईल. सरत्या वर्षातील प्रत्येक स्पर्धेत तिने चांगली कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्ध्याने सरस खेळ केल्यामुळे असेल किंवा ती थकल्यामुळेच पराजित झाली आहे. दुबईतील स्पर्धेच्या वेळी ती खूपच फ्रेश होती, रिलॅक्‍स होती. सुरुवातीच्या लढतीतील सफाईदार विजयामुळे आत्मविश्‍वासही उंचावला. हेच ओकुहाराविरुद्धच्या अंतिम लढतीतही दिसले. 

गतवर्षीच्या तुलनेत पुरुष एकेरीत आपल्याला विजेतिपदे लाभली नसतील, पण भरगच्च कार्यक्रम तसेच दुखापतींचाही त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. महत्त्वाच्या स्पर्धेतील एकंदरीत कामगिरी लक्षात घेतल्यास हे वर्ष चांगले गेले असेच म्हणता येईल, असेही गोपीचंद यांनी सांगितले. 

नव्या वर्षात ऑलिंपिक पात्रता निश्‍चित होईल. रिओपेक्षा जास्त स्पर्धक टोकियोसाठी पात्र ठरणे मलाही आवडेल, पण स्पर्धा खूपच खडतर आहे. त्यामुळे हे नक्कीच कठीण दिसत आहे. स्पर्धा वाढल्या आहेत, त्यातील सातत्य महत्त्वाचे आहे. दुहेरीसाठी पात्रता जास्त अवघड आहे. 
- पुल्लेला गोपीचंद 

संबंधित बातम्या