ऑलिंपिक पात्रतेपासून कुस्तीगीर सुमित आता एक विजय दूर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 May 2021

कुस्तीगीर सुमित ऑलिपिक पात्रतेपासून एक विजय दूर आहे. त्याने जागतिक ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सत्यव्रत काडियन आणि अमित धनकरचे आव्हान संपुष्टात आले आहे.

मुंबई - कुस्तीगीर सुमित ऑलिपिक पात्रतेपासून एक विजय दूर आहे. त्याने जागतिक ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सत्यव्रत काडियन आणि अमित धनकरचे आव्हान संपुष्टात आले आहे.  

सुमितने १२५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत ताजीकिस्तानच्या रुस्तम इस्कांदारी याला १०-५ असे पराजित केले. आता त्याची लढत व्हेनेझुएलाच्या डॅनियल दिआझ रॉबर्टीविरुद्ध होईल. ही लढत जिंकल्यास सुमितचा ऑलिंपिक प्रवेश निश्चित होईल. सुमितची वाटचाल धक्कादायक आहे. तो पात्रता फेरीत किर्गीजस्तानच्या ऐईसॅल याच्याविरुद्ध २५ सेकंद असताना १-२ मागे होता, पण त्याने एक गुण मिळवत बाजी मारली.

त्यानंतरच्या लढतीत ०-२ पिछाडीनंतर मोल्दोवाच्या अलेक्झांडर रोमानोव याला ३-२ असे हरवले. सत्यव्रतने ५-१ आघाडीनंतर बल्गेरियाविरुद्धच्या सुल्तानोविच बातीव याला हरवले. अमित कुमार धनकरच्या ऑलिंपिक पात्रतेच्या आशा पात्रता फेरीतच संपुष्टात आल्या. मिखाईल सावा याने ९-६ असे पराजित केले. अमितने सुरुवातीस आव्हान दिले, पण त्यानंतर तो फार काही करू शकला नाही. त्यामुळे सलग दोन स्पर्धांत भारतीय कुस्तीगीर फ्रीस्टाईलच्या ७४ किलो गटात एकही भारतीय नसेल.


​ ​

संबंधित बातम्या